उत्तर प्रदेशचा रहिवासी असणारा हा 83 वर्षांचा रिटायर्ड पोस्टमनने आपल्या मृत्यू झालेल्या आजारी पत्नीच्या आठवणीत एक छोटा मिनी ताजमहल बांधले, म्हणून तो लोकांसाठी एक भावनिक प्रतीक ठरला आहे. तो स्वतः सुद्धा आता या जगात राहिला नाही. उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहर येथे गुरुवारी रात्री टेहळत असताना एका कारने त्यांना उडवले म्हणून त्यांचा मृत्यू झाला.

त्या व्यक्तीचे नाव होते Faizul Hasan Qadri. अलिगढ मधल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्सिडेंट झाल्यावर त्यांना येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या अक्सिडेंट बद्दल आपल्याला एवढीच माहिती आहे की, कासेर कलन या गावी, गुरुवारी रात्री कादरीसाब फिरायला म्हणून घराच्या बाहेर पडले. कादरी साब वृद्ध असल्यामुळे चालण्यासाठी ते वॉकरचा उपयोग करायचे. एका भरधाव वाहनाने त्यांना चालत असताना उडवलं, असल्याचे दिसून येत आहे. कादरी साब च्या परिवाराला 2 तासानंतर या हिट अँड रन अक्सिडेंटचा पता लागला.

कादरीसाब आपल्या प्रेम निशाणीमुळे सर्व प्रचलित आहेत. त्यांनी आपल्या पत्नीच्या आठवणीत एक छोटा ताजमहल बांधला आहे. आणि तसेच याच इमारतीच्या पाठीमागे मुलींच्या शाळे करीता त्यांनी जमीन दान देखील केली आहे. कादरीसाब ची पत्नी ताजमुली बेगम 2011 मध्ये घस्याच्या कॅन्सरमूळे जग सोडून निघून गेली होती. या दोघांचे लग्न 1953 मध्ये झाले होते. परंतु दोघांना एकही अपत्य नव्हते.

ताजमुली बेगमच्या निधनानंतर कादरीसाब ने या इमारतीचं बांधकाम चालू केलं. या मध्येच कादरीसाबच्या पत्नीला पुरण्यात आलं. कोणतीही स्थिती आणि कसलेही संकट कादरीसाबला ही इमारत बांधण्यापासून अडवू शकली नाही. 2014 मध्ये जेंव्हा त्यांच्या कडे इमारत बांधण्यासाठी पैसे कमी पडले तेंव्हा आपल्या पेन्शनच्या सेव्हिंग मधून त्यांनी तर काम पूर्ण केलं. 2015 मध्ये जेंव्हा अखिलेश यादवनी बांधकाम पूर्ण करण्यासाठी पैसे देऊ केले तेंव्हा त्यांनी आदरपूर्वक ते पैसे घेण्यास नकार दिला. त्याऐवजी त्यांनीच आपली चार बिघा जमीन मुलींच्या शाळेकरिता दान म्हणून देऊन टाकली. ती शाळा आता पूर्ण होऊन उभी आहे.

कादरीसाबला सुद्धा त्यांच्या पत्नीच्या बाजूलाच पुरण्यात येईल. अजून सुद्धा छोट्या ताजमहल च बांधकाम अपूर्ण आहे. कादरीसाबने मरण्यापुर्वी 2 लाख रुपये जमा करून ठेवले होते. छोट्या ताजमहल च बांधकाम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या संगमरवर खरेदीसाठी त्यांनी हे पैसे जमा केले होते. परंतु काळाने घात केला, याचं बांधकाम पूर्ण होण्या आधीच कादरीसाब जग सोडून निघून गेले.

” आजूनसुद्धा या इमारतीला पूर्ण करण्यासाठी संगमरवरची आवश्यकता आहे. कादरीसाबला सुद्धा त्याच इमारतीत त्यांच्याच पत्नीच्या शेजारी पुरण्यात आलं आहे. ही इमारत पूर्ण करण्यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे,” असं कादरीसाबच्या एका नातेवाईकाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here