विमा पॉलिसी मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) यांनी हे बदल घडवून आणले आहेत. सर्व वाहन पॉलिसीसाठी विम्याचे प्रीमियम आता वाढवले गेले आहे आणि त्यामुळे वाहनांच्या मालकांसाठीचा कव्हर हा 15 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

2011 मध्ये झालेल्या एका दुर्घटनेमुळे हा इन्शुरन्स कायदाच बदलला गेला. त्यावेळी तरुणाची त्याच्या स्वत:च्या मोटारसायकल प्रवास करीत असताना सायकल स्वारासोबतची धडक टाळण्यासाठी म्हणून तो स्वतः दुर्घटनाग्रस्त झाला. मृत व्यक्तीच्या पत्नीने मोटार अपघात क्लेम ट्रिब्यूनलशी संपर्क साधला. तेव्हा थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर अंतर्गत जूरीने 53 लाख रुपयांचे नुकसान भरपाई जाहीर केली. परंतु, युनायटेड इंडिया इन्शुरन्सने या आदेशाविरूद्ध अपील केले, कारण विमा संरक्षण फक्त थर्ड पार्टी साठीच आहे आणि वाहनांच्या मालकांसाठी नाही, असा निकाल दिला. त्यानंतर पॉलिसी अंतर्गत मृत व्यक्तीच्या पत्नीला फक्त 1 लाख रुपये देण्यात आले. त्यामुळे आता हा कायदा बदलण्यात आला आहे.

थर्ड पार्टी इन्शुरन्स कायद्यातील (सुधारित) तरतुदी खालील प्रमाणे –

  • आता सर्व वाहन मालकांना वाहन इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत 15 लाखापर्यंतचा जीवन विमा काढावा लागणार आहे. आणि हे बंधनकारक आहे.
  • मृत्यूमुखी पडलेला मालक गाडी चालवत असेल अथवा मागे बसला असेल, दोन्ही केस मध्ये इन्शुरन्स देण्यात येईल. यामुळे मृतांच्या घरच्यांना खूप मोठा आधार होणार आहे.
  • विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने सर्व थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपन्यांना निर्देश दिले आहेत की आता वाहन चालकासोबतच मालकाला पण थर्ड पार्टी इन्शुरन्सचा फायदा घेता येणार आहे.
  • या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये प्रति वर्ष फक्त 750 रुपयांचा प्रीमियम भरावा लागणार आहे.
  • प्रत्येक वाहन मालकाला, ज्याच्या कडे दुचाकी असो अथवा कार असो त्याला हा इन्शुरन्स भरणे हे अनिवार्य आहे. ही इन्शुरन्स पॉलिसी सर्व वाहन मालकांवर बंधनकारक आहे.
  • सर्व थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपन्यांना 5 वर्ष आणि त्याहून जास्त काळ असणारे टर्म इन्शुरन्स दुचाकीसाठी आणि कार आणि स्कुटर साठी 3 वर्षापर्यंतचे टर्म इन्शुरन्स पुरवणे बंधनकारक आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर 2017 मध्ये मद्रास हाय कोर्टाने वाहन इन्शुरन्स 1 लाखा पासून 15 लाखापर्यंत वाढवण्याचे आदेश दिले होते. यावर United India कंपनीने मद्रास हाय कोर्टाचे आदेश लक्षात घेतले आणि त्यावरचे आपले मत सुद्धा नोंदवले होते. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच थर्ड पार्टी इन्शुरन्स कायद्यात बदल करण्यात आला आहे आणि त्याचा फायदा लाखो चालक आणि मालक दोघांनाही होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here