केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी या एकत्रिकरणाची माहीत दिली, त्यावेळी बोलताना अरुण जेटली यांनी सांगितले की,“हे एकत्रीकरण या बँकांना आणखी मजबूत, शाश्वत आणि त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढवेल.”

सरकाने याबाबत माहिती देताना म्हटले की, ‘सरकारी मालकीच्या बँक ऑफ बरोडा, देना बँक आणि विजया बँक या तिन्ही बँकांचे एकत्रिकरण केले जाईल, ज्यामुळे तयार होणारी बँक ही भारतातील तिसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी बँक असेल. या एकत्रिकरणामुळे या बँकांच्या प्रक्रिया आणि कामे वाढतील.’

सरकारचं हे पाऊल गेल्या वर्षी SBI च्या पाच सहकारी बँका आणि भारतीय महिला बँक यांचं SBI मध्ये झालेल्या एकत्रिकरणानंतरच पाऊल आहे. अरुण जेटली यांनी सांगितलं की तिन्ही बँकांची कर्ज देण्याची क्षमता कमजोर झाली आहे, कॉर्पोरेट क्षेत्रातील गुंतवणूक ढासाळली आहे, वाजवी पेक्षा जास्त कर्ज दिल्याने काही बँकांची परिस्थिती डबघाईला आली आहे आणि नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्सचं(NPA) बँकांमध्ये वाढत प्रमाण यामुळे या बँका व्यवस्थित काम करण्याच्या स्थितीत नाहीत.

या तिन्ही बँकांमध्ये NPAs प्रमाण खूपच जास्त असल्यामुळे त्यांना जागतिक बेस-III स्तरातील बँक होण्यासाठी यांना कोट्यावधी रुपयांच्या भांडवलाची आवश्यकता असणार आहे.

तिन्ही बँकेचे बोर्ड ऑफ बँक्स ह्या प्रस्तावाचा अभ्यास करणार आहे असं वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी सांगितल. आणि हे एकत्रिकरण या बँकांची कार्यक्षमता आणि ग्राहक सेवा वाढवणार आहे असेही राजीव कुमार म्हणाले. यामुळे या तिन्ही बँकांच जाळ पसरणार आहे आणि या बँकांवरचा विश्वास, कर्ज देण्याची क्षमता, ग्राहकांना सेवा या सर्वामध्ये वाढ होणार आहे, अशी ही भारतातली तिसरी मोठी बँक असून एकत्रिकरणानंतर सुद्धा या तिन्ही बँका स्वतंत्ररीत्या काम करू शकतील असं वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here