Gujarat worth

वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट नुसार सर्वाधिक समृद्ध देशांपैकी भारत हा सहाव्या स्थानी आहे. या रिपोर्ट नुसार गुजरात कडे 56 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. हे आकडेवारी एक अंदाज आहे. अगदी खरी आणि तंतोतंत आकडेवारी ही यापेक्षा नक्कीच जास्त असेल. जगातल्या 19 देशांच्या GDP एवढी GDP ही एकट्या गुजरातची आहे. राज्याच्या GDP मध्ये फार्मसिटीकल क्षेत्रा सोबतच सुरतच्या डायमंड मार्केटचाही मोठा वाटा आहे. दर वर्षी 5 लाख कोटींची उलाढाल करणारा हा डायमंड व्यापार दर वर्षी 2 लाख कोटी रुपयांच्या हिऱ्यांची निर्यातही करतो. सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे भारताच्या चालनावर फोटो ज्यांची आहे, ते महात्मा गांधी हे गुजराती, आणि या चलनाला लीगल टेंडर बनवणारी RBI च्या गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सही ही सुद्धा गुजराती. भारतात सध्या गुजरात-गुजरात गाजत आहे.

गुजरातच्या 56 लाख कोटी धनाची शहानिशा –

१) डायमंड उद्योगाचा वार्षिक टर्नओव्हर 5 लाख कोटी पेक्षा जास्त.

२) चार मोठ्या मंदिराकडून 100 कोटी पेक्षा जास्त आवक.

३) राज्यातील बँकेत 6 लाख कोटीं पेक्षा जास्त ठेवी, आणि फक्त दोन बँकेत 6200 कोटी रुपये.

४) गुजरात आणि मुंबई यांच्यात दर वर्षी 70 हजार कोटी रुपयांची कॅशची देवाण घेवाण.

५) टेक्सटाईल उद्योगाचा वार्षिक टर्नओव्हर 55 हजार कोटी पेक्षा जास्त.

६) 1 हजार कोटी रुपये टर्नओव्हर असणाऱ्या 200 कंपन्या

७) सोमनाथ मंदिराकडून 4.5 कोटी श्रावणी आवक.

गुजरात मध्ये 58 लोकं असे आहेत ज्यांना पैशांची काहीच कमी नाही. त्या एकूण 58 लोकांची मिळून 2,54,400 कोटी रुपयांची एवढी मोठी संपत्ती आहे. एकट्या गौतम अदानी कडे 71000 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर पंकज पटेल यांच्याकडे 32100 कोटी रुपयांची संपत्ती आहे. एकूण करोडपती पैकी 84 % करोडपती हे अहमदाबाद मध्ये राहतात.

गुजरातच्या मंदिराच्या प्रसादापासून 8 कोटी रुपयांची कमाई होते.चार मोठ्या मंदिरापासून 100 कोटी पेक्षा जास्त रकमेची आवक होते. त्यातल्या अंबाजी मंदिराची वार्षिक आवक 42 कोटी रुपये एवढी आहे. तसेच सोमनाथ मंदिरापासून 40 कोटी रुपयांची आवक ही फक्त प्रसाद वाटपातून होते. द्वारकाधीश मंदिराची आवक 10 कोटी आहे. तसेच रंछोडराय मंदिरापासून 12 कोटी रुपयांची आवक आहे.

RBI च्या माहितीनुसार राज्यातील विविध बँकेत मार्च 2017 पर्यंत ठेवलेल्या ठेवीची रक्कम ही 6.2 लाख कोटी इतकी आहे. मार्च 2016 पर्यंत ही रक्कम 5.3 लाख होती. 1 लाख कोटी रुपयांची ठेवीत वाढ झाली आहे. धर्मज आणि माधापूर या दोनच गावांची ठेवी ही 6 हजार कोटी रुपयांची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here