जर कोणी आपल्याला विचारले की, तुमच्या लहानपणी तुम्हाला TV वर काय पाहायला आवडायचं ? तर तुमचंच काय सर्वांचं एकच उत्तर मिळेल आणि ते म्हणजे ‘शक्तिमान’. लहान मुलांचा हा आवडता प्रोग्राम होता. आजही बरेच चॅनेल्स शक्तीमान सिरीयलचं रि-टेलिकास्ट करतात. आजच्या काळातील लहान मुलांना सुद्धा शक्तीमान पाहायला खूप आवडतो. फक्त लहानांनाच नाही तर आपल्या सारख्या मोठ्या आणि वयस्कर व्यक्तींनाही शक्तिमान पाहायला आवडतो.

अशाच शक्तिमानच्या चाहत्यांसाठी अशीच एक एकदम खुश करणारी बातमी आहे. आता शक्तिमान तुम्हाला तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, TV कशावरही आणि कधीही पाहता येणार आहे. कारण शक्तिमान आता Amazon Prime वर आला आहे. शक्तिमान चे दोन सिरीज ऍमेझॉन प्राईम वर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे असं वाटतंय की लहानपणीचे चांगले दिवस परत आले आहेत. भारताचा पहिला सुपरमॅन म्हणवला जाणार ‘शक्तिमान’ ने Amazon Prime वर नुकतंच लँड केलं आहे.

1997 पासून ते 2005 पर्यंत डी डी नॅशनल वर शक्तिमान दर रविवारी सर्वांना पाहायला मिळायचा. दर रविवारी दुपारी 12 वाजता शक्तिमान बघण्यासाठी सर्व जण TV पुढे येऊन बसायचे. 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय शो म्हणून शक्तिमानची ओळख आहे. 13 सप्टेंबर 1997 पासून ते 27 मार्च 2005 पर्यंत दूरदर्शन वर दाखवण्यात आला. या मध्ये मुकेश खन्ना हे लीड रोल प्ले करायचे. ‘कानून का दोस्त, मुजरिमो का दुष्मन‘ ही पंक्ती शक्तिमान साठी होती पण ती एवढी प्रसिध्द झाली लोक त्याचा बोली भाषेत बोलताना उपयोग करत आहेत.

शक्तिमान मध्ये शक्तीमान ने दोन रोल प्ले केले होते. एक शक्तिशाली शक्तिमान आणि दुसरा एक सामान्य व्यक्तीचा रोल ज्याला सर्व जण गंगाधर या नावाने ओळखतात. गंगाधरचे संपूर्ण नाव विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री होते. त्याचे पुढेचे दोन दात हे बाहेर आलेले असायचे आणि त्याचे बोलणे त्याचा आवाज हा इतका वेगळा होता की लहान मुले त्याच्या आवाजानेच जास्त हसायचे.

अशी एक गोष्ट झाली होती, अमेरिकेकडे सुपरमॅन आहे, तर मग भारताकडे कोण आहे ? तर याला उत्तर देण्यासाठी भारताने शक्तिमानला पुढे केले. तुमच्या कडे सुपरमॅन आहे तर मग आमच्या कडे शक्तिमान आहे. शक्तिमान मध्ये त्याचे दोन प्रमुख दुष्मन होते एक डॉ जॅकॉल आणि दुसरा त्याचाही प्रमुख किलविष. डॉ जॅकॉल ची ती पावर म्हणायची स्टाईल आणि किलविषचा नारा ‘अंधेरा कायम रहे‘ यांना आजही कोण विसरू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here