• भारत हा एक सहिष्णू आणि विविधता पूर्ण  देश आहे. याच भूमीत बुद्ध, जेन, शीख धर्मांचा उदय झाला. हि परंपरा अनेक वर्ष्यांची आहे. 
  • २५००- १२००  इसा.पूर्व जेव्हा सिंधू संस्कृती अस्तित्वात होती  तेव्हा पशुपती नामक देवतेचे कोरीवकाम असलेल्या मुद्रा आढल्या. यावरून आपल्याला हे कळते कि भारत भूमीत मंदिर आणि पूजा अर्चा हे नवीन नाहीत. 
  • भारतात मंदिरांचे स्थापत्य शास्त्रानुसार दोन उत्तर आणि दक्षिण असे प्रकार पडतात. “नगारा स्टाईल” म्हणजे उत्तर भारतीय मंदिरे आणि “द्रविड स्टाईल” म्हणजे दक्षिण भारतातील मंदिरे . 
  • पूर्वी मंदिरांना खर्च भगवा म्हणून काही गावे वतन म्हणून दिली जात. त्यातून त्याचा खर्च भागे. तसेच काही मंदिरे हि  राजे, महाराजे सांभाळत. पूर्वीपासून मंदिरे आणि अर्थकारण हे मंदिरे आणि श्रद्धा इतकेच महत्वाचे राहिले आहे.
  • मंदिरांमधील संपत्ती लुटण्यासाठी अनेक परकीय आक्रमणे झाली तरी आज भारतात मंदिरे रुबाबात उभी आहेत. काही मंदिरांचे वार्षिक उत्पन्न हे आफ्रिका मधील काही देशांच्या GDP पेक्षा हि जास्त आहे .

या आर्टिकल मधून तुम्हाला मंदिराचे उत्पन्न, त्याचे ठिकाण आणि काही Interesting facts कळणार आहेत. 

चला तर मग वेळ न घालवता सुरु करूयात,

१) पदमनाभस्वामी मंदिर – केरळ

Sree_Padmanabhaswamy_Temple_kerala

Image Credit – WikiMedia

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून या चा उल्लेख होतो. Dravidian type of architecture चा हा उत्तम नमुना आहे. हे विष्णू मंदिर आहे. सरकारी आकडेवारी नुसार या मंदिरात असलेले सेने आणि इतर मैल्यवान वस्तूं ची किंमत २२ बिलियन डॉलर्स (९०,००० करोड ) इतकी आहे. मध्यंतरी या मंदिरात जो खजाना सापडला आहे त्या मुळे हे मंदिर प्रथम क्रमांकावर आले आहे. 

२) तिरुपती व्यंकटेश्वरा मंदिर – आंध्रप्रदेश

Tirumala_Tirupati_Devasthanam

Image Credit – WikiMedia

जर डोनेशन मोजले तर या मंदिराचा क्रमांक जगात प्रथम लागतो. हे सुद्धा विष्णू मंदिर आहे. या मंदिर ची वेल्थ मोजली तर ती २० बिलियन डॉलर्स इतकी आहे यात हे मंदिर ११ मिलियन  डॉलर्स (७५,००,००,००० रुपये) हे लाडू च्या प्रसादामधून कमावते. 

३) साई बाबा मंदिर- महाराष्ट्र

Sai_baba_samadhi_mandir_shirdi

Image Credit – Wikipedia

साईबाबा मंदिर Organisation हि  भारतातील श्रीमंत Temple organisation  आहे. साईबाबा हे कोण्या एका धर्मासाठी पवित्र  नसून सर्व धर्मातील लोक यांची पूजा करतात. उत्पन्नाचा विचार करायचा झाला तर या मंदिराकडे वार्षिक ८१ करोड जमा होतात तसेच ९२० किलो सोने आणि ४४० किलो चांदी  आहे. 

४) वैष्णोव देवी माता मंदिर – जम्मू आणि काश्मीर

Vaishno_Devi_Bhavan

Image Credit – Wikipedia

हे देवीचे मंदिर भारतातील ५१ शक्तिपीठांमधील एक आहे. प्रतिवर्ष ८ मिलियन भाविक येथे येताहेत. मंदिराचे वार्षिक उत्पन्न हे ५०० करोड रुपये आहे. 

५) सिद्धिविनायक मंदिर- महाराष्ट्र

siddhivinayak temple mumbai

Image Credit – Wikimedia

सिद्धिविनायक मंदिर हे गणेश मंदिर  आहे. या मंदिराची ट्रस्ट हि मुंबई मधील सर्वात श्रीमंत ट्रस्ट आहे. २५०००- २ लाख भाविक प्रति दिवस असे या मंदिराचे रेकॉर्ड आहे. मंदिराचे वार्षिक उत्पन्न हे ४८- २५५ करोड च्या दरम्यान आहे. 

६) गोल्डन टेम्पल – पंजाब

Golden_Temple_Amritsar

Image Credit – Flickr

शीख धर्मातील एक महत्वाचा गुरुद्वारा आहे याला श्री हरमिंदर साहिब गुरुद्वारा या नावाने सुद्धा ओळखले जाते. गुरुद्वारा हा सोन्याने मढवलेला आहे. जगातून अनेक भाविक या गुरुद्वाऱ्याला भेट द्यायला येत असतात. या मंदिराचे वार्षिक उत्पन्न ५०० करोड आहे.

७) मीनाक्षी मंदिर – तामिळनाडू

meenakshi temple

Image Credit – Flickr

महादेव आणि पार्वती या हिंदू देवतांना समर्पित हे मंदिर जगातील नवीन सात आश्यर्य या मधील प्रथम ३० नॉमिनीस मध्ये आहे. मंदिराला २०-३०००० लोक दररोज भेट देतात. मंदिराचे वार्षिक उत्पन्न ६० मिलियन इतके आहे. 

८) जगन्नाथ मंदिर – ओडिशा

jagannath temple

Image Credit – Flickr

या मंदिराचा बँक डिपॉझिट  आहे १५० करोड. या मंदिराची रथयात्रा हि प्रसिद्ध आहे. या मंदिराला ३०००० भाविक प्रति दिवशी भेट देतात आणि फेस्टिवल च्या काळ्या ७०००० पर्यां भाविक मंदिराला भेट देतात. 

९) कशी विश्वनाथ मंदिर – उत्तरप्रदेश

Kasi Viswanathar Temple

Image Credit – Wikimedia

हे मंदिर महादेवाला समर्पित आहे. महादेवाच्या १२ जोतिर्लिंग पैकी हे एक मानले जाते. अनेक परकीय आक्रमण करांनी या मंदिराची यथेच्य लूट केली होती. या मंदिराला प्रति वर्षी ३ मिलियन भारतीय भाविक आणि २०००,००० आंतराष्ट्रीय भाविक भेट देतात. मंदिराला ४-५ करोड रुपये वार्षिक दोनतीन भेटते.

१०) शबरीमला मंदिर – केरळ

Sabarimala Temple

Image Credit – Wikipedia

मध्यंतरी भारतीय सुप्रीम कोर्ट च्या महिलांच्या बाजूने दिलेल्या निर्णयावरून हे मंदिर फार पॉप्युलर झाले. अय्यप्पा स्वामीं चे हे मंदिर आहे. मंदिराला जायला पूर्ण जंगल वाट आहे. ३०-४० मिलियन भाविक या मंदीराचे दर्शन घ्यायला येतात. या मंदिराचे वार्षिक उत्पन्न २३०-२५० कोटी रुपये आहे. 

११) सोमनाथ मंदिर – गुजरात

Somanath_mandir

Image Credit – Wikimedia

भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असे हे मंदिर आहे. महादेवाच्या १२ जोतिर्लिंग मधील एक हे ठिकाण आहे. परकीय आक्रमणकाऱ्यानी १७ वेळा हे मंदिर तोडले आणि लुटून नेले. तरी सुद्धा या मंदिर कडे इतकी संपत्ती आहे कि भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत येऊ शकेल. समुद्रकिनारी असलेले हे मंदिर पर्यटकांना खास आकर्षित करते. भारतातील सर्वात स्वच मंदिर असल्याचा दर्जा या मंदिराला भेटला आहे. या मंदिर कडे ३५ किलो सोने आहे. 

१२) गुरुवायूर मंदिर- केरळ

Guruvayur_Temple

Image Credit – Wikipedia

कृष्ण भगवाच साठी चे हे मंदिर हुंडून चे एक पवित्र स्थान आहे. मंदिराचे वार्षिक उत्पन्न ४०० कोटी आहे आणि स्थायी मालमत्ता २५०० करोड रुपये इतकी आहे. 

१३) महालक्ष्मी मंदिर – महाराष्ट्र

Mahalaxmi_Temple_Kolhapur

Image Credit – Wikimedia

महालक्ष्मी देवीचे हे मंदिर माता दुर्गे च्या  ५२ शक्तिपीठां मधील एक आहे. तसेच महाराष्ट्र मधील श्रीमंत मंदिरां पैकी एक आहे. मंदिराचे वार्षिक उत्पन्न १४,६६,८३,००० रुपये इतके आहे.

१४) अमरनाथ मंदिर – जम्मू आणि काश्मीर

समुद्र सपाटी पासून ३,८८८ मीटर उंचीवर वसलेले हे मंदिर महादेवाच्या बर्फापासून बनणाऱ्या पिंडी मुले प्रसिद्ध आहे. जशी बर्फाची पिंड बनायला सुरवात होते ताशे भाविक डोंगर दऱ्यांमधून मार्गक्रमण करत मंदिरापर्यंत पोचतात. यंत्रे च्या काळात २ लाख पर्यंत भाविक दर्शन घेतात. 

Lord_Amarnath

Image Credit – Wikipedia

१५) अक्षरधाम – दिल्ली

Akshardham_Delhi

Image Credit – Wikipedia

भारतातील सर्वात मोठ्या मंदिर आवारापैकी हे एक आहे. मंदिराचे एका दिवसाचे उत्पन्न ५००० – १०००० रुपये इतके आहे. वार्षिक उत्पन्न ५०,००००० इतके आहे. 

आता आपल्याला कळलेच असेल कि मंदिर आणि अर्थकारण कसे जोडले गेले आहे ते.

भारताच्या संविधान मधील आर्टिकल-२७ जो फंडामेंटल राईट आहे त्या नुसार कोणत्या हि धार्मिक संस्थांवर टॅक्स लावला जात नाहीं त्यामुळे मंदिरांचे आणि संस्थानांचे उत्पन्न हे टॅक्स फ्री असते. 

आजच्या आर्टिकल मध्ये इतकच. हे आर्टिकल कसे वाटले, तुमचे प्रश्न, अभिप्राय आणि शंका ततुम्ही काली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. अश्याच वेगवेगळ्या आणि अर्थपूर्ण माहिती मराठी भाषेतून मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉग ला विशीत करा आणि तुमच्या  मित्र-मैत्रिणीं मध्ये शेअर करा.