What is Sukanya Samriddhi Yojana ?

प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची काळजी असते, मुले लहान असतानाच त्यांच्या उद्याच्या भविष्याची चिंता आईवडील करत असतात आणि आपल्या भागात नव्हे संपूर्ण भारतात लग्नात काय काय होतं, खर्च किती येतो हे माहित असेलच, आपल्याला मुलांपेक्षा जास्त काळजी ही मुलींची वाटते, कारण ती एक ठराविक काळा नंतर घर सोडून जाणार असते आणि तिच्या लग्नात तिच्या वडिलांना खूप खर्च सोसावा लागतो. सरकारने आईवडीलांच्या काळजीचा काही भार उचलत मुलींसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. चला तर पाहूया अशीच एक सुकन्या समृद्धी योजना आपल्यास कितपत योग्य असेल.

हि योजना मोदी सरकारद्वारे सुरु करण्यात आली असून, या योजनेने घरामधील लहान मुलींच्या भविष्यासाठी चांगली मदत उपलब्द करून दिली आहे.

१ ऑक्टोबर २०१८ पासून ह्या योजनेवर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) च्या तुलनेमध्ये ०.५% व्याज जास्त भेटेल आणि ही आई वडिलांच्या कर नियोजनासाठी उपयोगी बाब ठरेल. सध्याला ८.१% वार्षिक व्याज मिळत आहे परंतु आता टक्केवारी मध्ये वाढ करण्यात आली असून १ ऑक्टोबर २०१८ पासून ८.६% प्रमाणे देण्यात येईल. या टक्केवारीच्या तुलनेत पीपीफची वार्षिक टक्केवारी कमी आहे .

तुम्ही तुमच्या १० वर्षा खालील मुलींचं खाते उघडू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते तुम्ही खालीलप्रमाणे कोठेही उघडू शकता.

  • आपल्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये.
  • बहुतेक सर्व सरकारी बँकामध्ये.
  • ज्या बँकामध्ये पीपीफ खाते खोलायची सुविधा आहे तिथे खोलून दिले जायेल.

खाते खोलण्यासाठी बँकामध्ये लागणारे कागदपत्रे (Documents)

  • सुकन्या समृद्धी योजनेच्या फॉर्मचा तुम्ही pdf डाउनलोड करू शकता. (PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)
  • मुलीचे जन्मपत्र
  • सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म
  • आई वडिलांचे आधारकार्ड,पासपोर्ट,पैन कार्ड, राशनकार्ड, ड्राइविंग लाइसेंस
  • आई वडिलांचा पत्ता असलेला राशन कार्ड,बिजली बिल, टेलीफोन बिल.

खाते खोलण्यासाठी लागणाऱ्या अटी खालीलप्रमाणे-

  • तुमी ह्या योजनेमध्ये खाते तेंव्हाच उघडू शकता, जेंव्हा मुलीचे आई वडील नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक असतील.
  • एका मुलीच्या नावावर एकच खाते खोलू शकता
  • सर्व मिळवून आपण दोन मुलींच्या नावावर हे खाते खोलू शकता किंवा दुसर्या मुलीच्या जन्माच्या वेळी TWINS झाले असतील तर तिसर्या हि मुलीचे खाते खोलू शकता.

sukanya samriddhi yojana

सुकन्या समृद्धी योजना चे फायदे-
  • पीपीएफ च्या तुलनेमध्ये जास्त व्याज भेटेल.
  • ह्या योजनेमध्ये जमा केल्या जाणाऱ्या राशीवर आयकर विभागाच्या कलम ८० नुसार १.५ लाख रुपया पर्यंतच्या राशीवर सुट भेटेल.
  • जमा राशीवर मिळणारे व्याज आणि परिपक्वता (मैच्‍योरिटी) आणि मिळणारी रक्कम हि टॅक्स फ्री असेल.
आपण किती पैसे जमा करू शकता ?
  • सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये तुम्ही सुरवातीला १००० रुपये जमा करू शकता.
  • एका वर्षात जास्तीस जास्त एक लाख पन्नास हजार (१,५००००) रुपये जमा करू शकता.
  • जर तुमी एखद्या वर्षी पैसे भरले नाही, तर ५० रुपये दंड आकारला जाईल.
तुम्ही पैसे कधी काडू शकता ?
  • मुलीला १८ वर्ष पूर्ण होण्याच्या पहिले तुम्ही पैसे काढू शकत नाही.
  • मुलगी २१ वर्षा ची झाली कि तिचे खाते परिपक्वता (मैच्‍योर) होते.
  • मुलीचे खाते १८ वर्ष पूर्ण झाल्या नंतर आंशिक निष्कर्ष सुविधा उपलब्ध होईल म्हणजे तुम्ही खात्यामधल्या जमा राशीमधून ५०% रक्कम काढू शकता.
  • दुर्दैवाने जर मुलीचा मृतू झाला तर तिचे खाते बंद होईल आणि अशा वेळी खात्यातील रक्कम पालकांना दिली जाते.

जर हि पोस्ट आवडली तर नक्की Share करा ह्या मध्ये तुमच्या परिवाराचा फायदा आहे मामा, काका, मावशी, मोठे भाऊ, ताई, खूप फायदेमंद पोस्ट आहे WhatsApp Share बट्टन तुमच्या स्क्रीन वर आहे.