- महिला आणि त्यांचे अधिकार म्हंटले तर अगदी स्वतःला पुरोगामी म्हणणारे लोक सुद्धा काहीशे अस्वस्थ दिसतात. आम्ही हुंडा दिलाय कि! ( लपून छापून किंवा गाडी, जमीन, फॉरेन ट्रिप, सोने). तिला जमीन घेऊन करायचंय काय? कर्ता पुरुष तर माझा मुलगा आहे. काही अतिहुशार लोक ज्यांचे विचार आणि जीवन शेताचा बांध इंच-इंच कोरण्याचा पलीकडे गेलेच नाहीत त्याचे शब्द म्हणजे, “मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी दुसऱ्याचे धन”.
- अश्याच मागासलेल्या दृष्टीकोनामुळे महिला मागे राहिल्या त्यांना त्यांचे हक्क समजले नाहीत आणि हक्क हे काही विद्याविभूषित महिलांपुरतेच मर्यादित राहिले. भारतीय संविधाना मधील अनेक Fundamental rights ची पायमल्ली झाली.
या आर्टिकल मधून तुम्हाला काय कळणार आहे?
- The Hindu Succession (Amendment)act.२००५ पार्श्ववभूमी थोडक्यात.
- जमिनीचे मालकी हक्क आणि (हिंदू) महिलांचा अधिकार.
- हिंदू धर्मा व्यतिरिक्त धर्मातील स्त्रियांचे जमिनी संबंधित अधिकार.
चला तर मग सुरु करूयात,
The Hindu succession (Amendment) act २००५ पार्श्ववभूमी थोडक्यात
जमिनीचा विषय आला कि पूर्ण परिवाराचा विषय येतो या साठी “Hindu Undivided Family” म्हणजे नक्की काय हे समजून घेणे गरजेचे आहे. एका पेक्षा जास्ती लोक ज्यांची वंशावळ हि सामान पूर्वजांपासून येते. नावानुसार हि व्याख्या फक्त हिंदूं साठी मर्यादित नाही तर Hindu Undivided Family या मध्ये हिंदू, जैन, शीख आणि बुद्धिस्ट या धर्मांचा सुद्धा समावेश होतो.
भारत देश स्वतंत्र झाल्यावर काही महत्वाचे नियम बनवण्यात आले. १९५६ साली महिलांसाठी महत्वाचा असा The Hindu Succession Act. १९५६ यात हिंदू व्यक्तीं मधील जमिनींचे वाटप कसे असेल याचे नियम दिले होते. या मधील एक चुकीची गोस्ट अशी होती कि यात महिलांना पिढीजात जमिनीवर लग्ना नंतर कोणताच हक्क नव्हता. घरातील फक्त पुरुष व्यक्तींना “करता” असे मानले जाई.
हे एक प्रकारचे Gender discrimination तर होतेच पण असंवैधानिक सुद्धा होते. या मुळे २००५ साली हा कायदा Amend केला गेला आणि नवीन The Hindu Succession(Amendment)act.२००५ हा अमलात आणला गेला. या मुळे हिंदू महिलांना सुद्धा आपल्या भावाच्या बरोबरीचे स्थान भेटले तसेच संविधानातील आर्टिकल १४, १५ जे “समतेचा अधिकार” सांगतात आणि आर्टिकल २१ जे “Right to life and personal liberty” सांगतात त्यांना उजाळा मिळाला. Gender discrimination कमी करण्यासाठी चे हे एक महत्वाचे पाऊल होते.
जमिनीचे मालकी हक्क आणि (हिंदू) महिलांचा अधिकार
The Hindu Succession (Amendment)act.२००५ नुसार आता महिलांना सुद्धा एक “करता” म्हणून गृहीत धरले गेले आहे. जमिनी या दोन प्रकारच्या असतात एक स्वतः कमावलेल्या आणि दुसऱ्या ज्या पिढीजात चालत आलेल्या. आता,
- जमीन तुमच्या वडिलांनी स्वतः विकत घेतली असेल तर– नियमांप्रमे ने हे पूर्णतः त्या व्यक्तीवर असेल कि त्या जमिनीचे काय करायचे. या मध्ये त्यांना जमिनीच्या वाटपाचा पूर्ण अधिकार असतो.
- जमीन चार पिढ्या मागची असेल- जसे तुमचे वडील, आजोबा, पणजोबा आणि खापर पणजोबा अशी चालत आलेली असेल तर तुमचा तुमच्या भावा प्रमाणे त्या जमिनीवर सामान हक्क आहे यात तुमचे वडील तुम्हाला डावलून जमीन तुमच्या भावाच्या नावाने करूशकत नाही असे केल्यास म्हातारपणी कारावासात जावे लागेल. म्हणजे इथे १९५६ च्या कायद्या मधील Gender discrimination संपवले आहे.
- मृत्यूपत्र लिहिण्या आधीच जर काळ ओढवला तर – सर्व कायदेशीर वारस आपला हक्क सांगू शकतात. या मध्ये जे पहिल्या वर्गातील म्हणजे पत्नी, मुले, मुली यांचा प्रथम अधिकार येतो आणि तो सुद्धा सामान.
- विवाहित मुलगी असेल तर- कायद्या नुसार ती माहेरच्या कुटुंबाचा भाग गृहीत धरली जाते. त्यामुळे मुली माहेरच्या जमिनीं मध्ये तेवढ्याच महत्वाच्या असतात जेवढे त्यांचे भाऊ .
हिंदू धर्मा व्यतिरिक्त धर्मातील स्त्रियांचे जमिनी संबंधित अधिकार
आपण हिंदू माता भगिनी याच्या Legal rights बद्दल माहिती घेतली आता इतर धर्मीय महिलांच्या जमिनी संबंधी चे rights थोडक्यात जाणून घेऊ.
मुस्लिम – घरातील अविवाहित मुलीचा पिढीजात संपत्तीवर भावा पेक्षा आर्धा अधिकार असतो. या जमिनीचे काय करावे आणि काय करू नये हे पूर्णपणे त्या मुलीवर अवलंबून असते.
ख्रिश्चन – अविवाहित मुलीला भावांप्रमाणेच जमिनीवर सामान अधिकार असतात. कायद्या ने अविवाहित मुलगी सांभाळ करणे हि वडलांची जबाबदारी आहे. मुलगी लग्न होऊन गेल्यास वडिलांची कायदेशीर जबाबदारी संपते.
आजच्या आर्टिकल मध्ये इतकंच. तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले, तुमचे अभिप्राय, प्रश्न तुम्ही खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता . असे माहितीपूर्ण आर्टिकल्स मराठी मधून मिळवण्यासाठी असेच आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा.