- खरेदीला गेल्यावर आपल्याला नेहमी ९९-९९९ अश्या किमती दिसत असतील. सुट्टे नाहीत म्हणून दोन चॉकलेट्स सुद्धा तुम्ही स्वीकारले असतील. पण कधी हा विचार केला आहे का कि असे नक्की का? याचा परिणाम नक्की काय होतो? आणि सर्वात महत्वाचे याचा फायदा आपल्याला कि विकणाऱ्याला?
- एका रुपया मुळे असा नक्की फायदा किती होत असेल. नाना पाटेकर मॉल मध्ये एका रुपया साठी तमाशा करतो आणि चॉकलेट स्वीकारत नाही हि विडिओ क्लिप पाहून आपण भरपूर हसलो पण त्यामागील तथ्य आणि आर्थिक विश्लेषण तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.
- तुम्ही जर विक्रेता असाल तर तुम्हाला आम्ही अश्या काही गोष्टी सांगणार आहोत कि त्या वापरून तुम्ही तुमचा नफा वाढवू शकता .
आजच्या आर्टिकल मधून तुम्हाला काय कळणार आहे?
- ९९-९९९ या किमतीं मागील रहस्य, या मागील फायदा आणि आर्थिक विश्लेषण.
- ग्राहकांसाठी काही टिप्स .
- विक्रेत्यांसाठी काही उपयुक्त टिप्स.
चालतर मग वेळ न घालवता आपण सुरु करूयात!!!
९९-९९९ या किमतीं मागील रहस्य
सर्वप्रथम अशा किमतीं मुळे विक्रेत्यांचा मोठा फायदा होतो. Freed-Hardeman University in Henderson मधील मार्केटिंग या विषयातील प्रोफेसर Lee E. Hibbet यांच्या मते एक रुपया कमी करून किंमत लावणे हा एक Psychological market strategy म्हणजेच मनोवैज्ञानिक बाजार धोरणाचा प्रकार आहे. ग्राहकाला मानसिकदृष्टया खरेदी करण्यास भाग पाडणे. यांच्या मते ग्राहक हा प्रथम डावीकडील अंक पाहतो आणि त्यानंतर च्या अंकांना दुय्यम महत्व देतो. उदाहरणार्थ – तुम्हाला जर कोणी म्हणाले कि त्याचा लॅपटॉप ६०,७०० रुपयांचा आहे. तेव्हा आपल्या डोक्यात ६०,००० हि किंमत प्रथम येते (डावीकडील) आणि ७०० नंतर येते. आणि तुम्ही हेच ग्राह्य धरता कि लॅपॉप ६०,००० ला घेतला आहे. अश्याच प्रकारे १०० रुपयाची वस्तू ९९ रुपयाला असेल तर ९० रुपये या हिशोबाने आपण खरेदी करणार आणि ९९ रुपये देणार.
दुसरा फायदा हा सुद्धा असू शकतो कि एक रुपया सुट्टा नसल्याने बऱ्याच वेळा विक्रेता १०० रुपये घेतो आणि ग्राहक सुद्धा तो एक रुपया सोडून देतो. ग्राहकाच्या आणि विक्रेत्याच्या बिलिंग स्लीप वर मात्र ९९ रुपयाची नोंद होते. म्हणजे हा एक रुपया बिलिंग स्लीप वर येत नाही, त्यामुळे टॅक्स रेकॉर्ड मध्ये हि दिसत नाही. आता लक्षात घ्या जर एका दुकानात एका महिन्यात १०००० ग्राहक येतात आणि अशी १० दुकाने आहेत. प्रत्येकाकडून जर असा एक रुपया ठेवून घेतला तर वार्षिक १,२०,००० एका दुकानाचे आणि १२,००,००० ते त्या १० दुकानांचे टॅक्स न लागणारे म्हणजेच ब्लॅक मनी चे उत्पन्न झाले .
टॉफी च्या बाबतीत म्हणायचे झाले तर आपल्याला एक रुपया म्हणून मिळणाऱ्या टॉफी चे ते बाजार मूल्य असते. त्यात विक्रेत्याला ०.२५ रुपये मिळतात. म्हणजे यात हि त्याचाच फायदा. आता तुम्हाला कळले असेल कि नाना पाटेकर ने किती बारीक आर्थिक विश्लेषण केले असेल.
ग्राहकांसाठी काही टिप्स
तुम्हाला आता कळलेच असेल कि मानसशास्त्रांचा वापर करून बाजारात विक्री काशि वाढवतात. आणि याचा पूर्ण फायदा हा विक्रेत्याला होतो. आणि नकळत ग्राहकच ब्लॅक मणी ला कसे प्राधान्य देतो. याला तोड म्हणजे ऑनलाइन शॉपिंग आहे. यात किंमत ९९.९९ जरी असली तरी आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI अश्या साधनांचा वापर करून तेवढेच बिल भरतो. यात आपला एक रुपया हि वाचतो आणि ब्लॅकमनी ला आळा हि बसतो. तसेच अनेक ऑनलाईन वेबसाईट्स वर आपल्याला ऑफर्स असतात आणि सेल सुद्धा असतात त्या मुळे आपल्याला फायदा होतो .
विक्रेत्यांसाठी काही उपयुक्त टिप्स
तुम्ही जर विक्रेता असाल आणि हि पोस्ट वाचत असाल तर तुम्हाला ९९-९९९ चा फायदा काळालाच असेल आता खाली अश्या ५ टिप्स सांगितल्या आहेत कि ज्या वापरून तुम्ही जास्ती जास्त फायदा करून घेऊ शकता.
- डावीकडील संख्या एक ने कमी करा आणि पैसे लहान दाखवा ९९.९९
- नंबर असा शोध कि म्हणताना कमी शब्दांचा वापर होईल. इंग्रजी भाषेसाठी महत्वपूर्ण आहे. उदाहरणार्थ – २७.८२ (ट्वेन्टी सेव्हन पॉईंट एटी टू -७ शब्द) च्या ऐवजी २८. १६(ट्वेन्टी ऐट पॉईंट सिक्सटीन ५- शब्द). कोमा वापरू नका (शद्ब वाढतात १,४९९/१४९९ )
- ग्राहकांना कमी शब्दप्रयोग असल्याने जास्त किंमत सुद्धा जास्त फायदेशीर वाटते. वस्तू पुढे ठेवा आणि किंमत कि छोट्या फॉन्ट साईझ मध्ये लिहा.
- फ्री हा शब्द जास्त वापरा . उदाहरणार्थ – १५ रुपये + २ रुपये शिपिंग च्या ऐवजी १८ रुपये + फ्री शिपिंग .
आजच्या आर्टिकल मध्ये इतकच. ग्राहकांना आणि विक्रेत्यांना दोघांना महत्वाच्या गोष्टी कळाल्या असतील. तुम्हाला जर काही शंका, अभिप्राय, प्रश्न आणि सूचना असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता आणि मराठी मधून अशी माहिती मिळवण्या साठी आपल्या ब्लॉग ला असेच व्हिसिट करत राहा.
१) साडीची किंमत कशी लावावी दुपटीने की तिपटीने?
२) साडी मध्ये मर्जिन किती असावी
१) साडीच्या बतीत जर सांगायचं झालं तर त्याच्या क्वालिटी नुसार किंमत लावणे योग्य असेल, पण किंमत लावतेवेळेस आर्टिकल मध्ये सांगितल्या सारखे किंमत लावल्यास फायदेशीर राहील.
२) कपड्याच्या बिजनेस मध्ये कमीत कमी २०% – ३०% मार्जिन असायला हवे, किंमत लावतेवेळेस व्यवस्थित किंमत लावणे सुद्धा आवश्यक आहे या मुळे अधिक गिऱ्हाईक येण्यास नक्की मदत होते.