रेल्वे रुळावर माणसे किंवा वाहने असतील तरी रेल्वे का थांबत नाही?

काही दिवसापूर्वी अमृतसर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर अनेक प्रश्न आपणाला पडले आहेत, त्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ट्रेनच्या पायलट ला रेल्वे रुळावर लोक दिसल्यास त्याने ट्रेन का थांबवली नाही? कित्येक लोकांचे प्राण वाचले असते.

या पोस्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत कि अमृतसर मध्ये झालेला अपघात जर ट्रेन चालकाने 2 किलोमीटर आधी ब्रेक लावला असता तर टाळला जाऊ शकत होता का ? परंतु 2 किलोमीटर पुढे काय चालू आहे हे याठिकाणी राहून चालकाला कळणे अशक्य होते. लोकांच्या गर्दी जवळ आल्यावर चालकाला लक्षात आले आणि चालकाने तात्काळ ब्रेक लावले, पण तरीही गाडी त्या ठिकाणी थांबू शकली नाही, कारण तिला 2 किलोमीटरचा ब्रेकींग डिस्टन्स पाहिजे होता.

आपण नेहमीच ऐकतो की रेल्वे रुळावर माणसे, जनावरे, गाड्या यांचा अपघात होत असतो. ट्रेनच्या ड्रायव्हरला लोको पायलट असे म्हणतात. त्याला जरी रुळावर काही दिसलं तरी तो ट्रेन का थांबवत नाही, याच कारण असं कि..

  • ट्रेनचा लोको पायलट तो चालवत असलेली ट्रेन थांबवू शकतो. जर त्याला पुरेसा ब्रेकींग डिस्टन्स मिळाला तर तो त्याची ट्रेन थांबवू शकतो.
  • ब्रेकींग डिस्टन्स म्हणजे कोणत्याही ट्रेनला तिच्या स्पीडनुसार ब्रेकींग डिस्टन्स लागतो. जर समजा ट्रेन 100+ किमी प्रतितास या वेगाने प्रवास करत असेल तर त्या ट्रेनला कमीतकमी 1.5 किमी एवढे अंतर ब्रेक लावायला लागेल. म्हणजे ज्या ठिकाणी इमरजेन्सी ब्रेक लावले तिथून पुढे दीड किलोमीटरवर जाऊन ट्रेन थांबेल.
  • एवढा मोठा डिस्टन्स ट्रेनला थांबण्यासाठी लागेल, आणि त्याचमुळे ड्रायव्हरला जरी ट्रॅक वर माणसं किंवा जनावरे दिसले तरी ब्रेक मारून काहीच फायदा नाही, कारण ब्रेक जरी मारले तरी ती अपघात निश्चित आहे.
  • भारतीय ट्रेन मध्ये सध्या जवळपास 22-24 डबे असतात. प्रत्येक डब्यात सरासरी 70 प्रवासी प्रवास करत असतात. ट्रेनच इंजिन जेंव्हा गती घेत तेंव्हा त्याच्याबरोबर हे डबे सुद्धा त्याच वेगाने धावतात. त्यामुळे आणि प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनच्या डब्याचे जडत्व वाढते. त्यामुळे ट्रेनला खूप मोठ्या ब्रेकींग डिस्टन्सची आवश्यकता असते.
  • ट्रेन स्पीडमध्ये असताना अचानक इमरजेन्सी ब्रेक लावणे धोक्याचे असते. जरी इंजिनला ब्रेक लागले तरी त्या ट्रेनच्या बाकी डब्याच्या ईनरशियामुळे (जडत्व) ट्रेन जागेवर थांबणार नाही. आणि इमरजेन्सी ब्रेकच्या झटक्यामुळे ट्रेनच्या आतील प्रवाशांच्या जीवाला सुद्धा धोका होतो. एका ट्रेन मध्ये जवळपास 1500 लोकं प्रवास करतात. त्यामुळे 1500 लोकांच्या जीवापेक्षा पुढे होणार अपघात जास्त स्वस्त आहे.
  • ट्रेनचा पायलट हा ठरावीक अंतरापर्यंतच पाहू शकतो. त्यामुळे ट्रेनच्या पायलट पेक्षा आपली जिम्मेदारी आहे की ट्रॅक किंवा क्रॉसिंगवर आजूबाजूला बघून व्यवस्थित काळजी घेऊनच पुढे जावे.
  • ज्याठिकाणी मानवरहीत क्रॉसिंग आहेत त्याठिकाणी काय चालले आहे, हे पायलटला क्रॉसिंग जवळ आल्यावरच कळते. म्हणूच पायलट क्रॉसिंग येत आहे लक्षात घेऊन जोराने हॉर्न वाजवतो.
  • जर पायलटला कमीतकमी 2 किमी दूर असतानाच कळालं की पुढे ट्रॅक वर काही तरी आहे आणि त्यामुळे भीषण अपघात होणार आहे तर मात्र नक्कीच पायलट इमरजेन्सी ब्रेक वापरून होणारा अपघात टाळू शकतो. त्यासाठी पायलटला लवकरात लवकर कळवणे आवश्यक असते. परंतु ती माहिती खरी आणि ऑथेेंटिक सोर्स कडून पायलटला मिळाली पाहिजे.

वरील सर्व कारणांमुळे जागरूक व्हा, आणि ट्रेनच्या रुळावर फिरणे, बसने किती धोक्याचे असते हे सर्वांना पटवून सांगा. जेणेकरून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी होईल.

अमृतसर मधील घटना खूपच दुर्दैवी होती, या पुढे जर सर्वांनी मिळून काळजी घेतली तर असे मोठे अपघात टाळता येऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here