Yamaha ची Yamaha RX-100 ही बाईक कधी काळची लोकांच्या पसंतीची उच्च सीमा गाठली होती.

90 च्या दशकात या बाईकची क्रेज एवढी वाढली होती की सांगता सोय नाही. प्रत्येकाला आपल्याकडे ही बाईक असावी वाटायची. परंतु आज मात्र ही बाईक शोधूनही कोठे मिळत नाही, रोड वर तर ही बाईक दिसतच नाहीये. परंतु आजही या बाईकला पसंद करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि यामुळेच या बाईकच्या चाहत्यांनी RX-100 ला नवीन लूक मध्ये सर्वांसमोर घेऊन आले आहेत.

तेलंगणाच्या एका ऑटोमोबाईल शॉपने RX-100 ला संपूर्ण मॉडिफाइड केलं आहे. या मॉडिफिकेशन नंतर ही बाईक एका नजरेत ओळखणं खूप कठीण झालं आहे. जुन्या लूक पेक्षा हा जो लूक आहे, तो इतका सुंदर आहे की, त्या गाडीच्या चाहत्यांनाही ती ओळखता अली नाही. परंतु तेलंगणातील ऑटोमोबाईल शॉपने केलेल्या या मॉडिफिकेशन वरून हे लक्षात येते कि अजूनही या बाईकचे शौकीन सामाजात आहेत, त्यांना अजूनही ही बाईक खूप पसंद आहे, आणि अजूनही ते या बाईकला रोडवर चालवण्यासाठी उत्सुक आहेत.

या मॉडिफाइड RX-100 ची बॉडी पुर्णतः जुन्या बॉडी पेक्षा वेगळी आहे. त्याचबरोबर या बाईकला दिलेला गण मेटल ग्रे कलर मुळे ही आणखीच रॉयल दिसत आहे. काही दिवसांपूर्वी याच कलरच्या Royal Enfield बुलेट बाईकची क्रेज किती वाढली होती, हे सर्वांना माहीत आहे. या बाईकच्या हेडला नवीन लूक दिला गेला आहे. त्यामुळे पहिल्याच नजरेत ही बाईक खूपच युनिक दिसत आहे. सर्वसाधारण बल्ब ऐवजी या बाईक मध्ये LED लाईट चा उपयोग केला गेला आहे. त्यामुळे ही लाइट इफिशिएन्ट बाईक आहे.

यावरून हे लक्षात येते की जी कोणती फॅशन/ट्रेंड/पसंती जुनी झाली आहे किंवा वापरात अजिबातच नाही, म्हणून ती मरते असं कधीच होत नाही. Fashion never dies, it just changes. फॅशन कधीच मरत नसते. फक्त त्या फॅशनची जागा नवीन फॅशन नी काही काळासाठी घेतलेली असते एवढंच. एक झाल्यानंतर एक अशा फॅशन चालूच असतात, आणि यात जुन्या फॅशनचा नंबर पुढे कधी येणार नाही असं कसं होणार. या बाईकवरूनच बघा ना, 90 च्या दशकातील ही बाईक आता नवीन लूक मध्ये रोडवर उतरली की नाही, मग बाकी गोष्टींचं पण तसंच होणार. तीन दिवसांपूर्वीच्या KBC शोमध्ये अमिताभ बच्चनने त्यांच्या काळातील बेलबॉटम पॅन्टच्या फॅशन बद्दल असेच विधान केले होते, त्यात ते म्हटले की येत्या चार-पाच वर्षात ती फॅशन परत रिपीट होईल, असा अंदाज त्यांनी सांगितला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here