आशिया कप हा साधारणतः आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामान्यांचा टोर्नमेंट आहे. आशिया कप 2018 हा United Arab Emirates(UAE) मध्ये होणार असून यात पाच पूर्णवेळ सदस्य देश भाग घेणार आहेत. 15 ते 28 सप्टेंबर दरम्यान हे टोर्नमेंट होणार असून आशिया कपची ही 14 वी आवृत्ती असणार आहे.

UAE मध्ये यापूर्वी आशिया कप दोन वेळा झाला आहे, आता तिसऱ्यांदा UAE मध्ये आशिया कप होतोय.

आशिया कप मध्ये पाच देश हे पूर्णवेळ सदस्य असून त्यात भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका यांचा समावेश होतो. आशिया कप क्वालिफायर 2018 जिकून यावर्षी हॉंगकॉंगने आशिया कप मध्ये जागा मिळवली आहे. म्हणून या वर्षी एकूण सहा टीम आशिया कप खेळतील. या सहा टीमचे तीन-तीन असे दोन गट तयार केले गेले आहेत.

Group’A’ – 1) हॉंगकॉंग, 2)भारत, 3) पाकिस्तान

Group’B’ – 1) अफगाणिस्तान, 2) बांगलादेश, 3) श्रीलंका, असे गट पाडण्यात आले आहेत.

 आशिया कप आणि यातील उत्कृष्ट खेळाडू –

 • भारताने आतापर्यंत झालेल्या 13 आशिया कप पैकी 6 कप जिंकले आहेत. त्या सहा पैकी 5 एकदिवसीय सामना टोर्नमेंट आणि एका T20 सामन्यांच्या टोर्नमेंट, 2016 मध्ये भारताने आशिया कप जिंकले आहे.
 • श्रीलंकेने 5 आशिया कप जिंकले आहेत. हे पाचही कप एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या टोर्नमेंटमध्ये जिंकले आहेत.
 • पाकिस्तानने आतापर्यंत 2 आशिया कप जिंकले आहेत.
 • सचिन तेंडुलकरने आता पर्यंत 21 आशिया कप इंनिंग खेळल्या आहेत. त्यात त्याने 971 धावा काढल्या आहेत. एकूण सामन्यात सचिनने दोन शतक आणि सात अर्धशतक काढले आहेत.
 • विराट कोहली ने आशिया कप मध्ये 14 इंनिंग खेळल्या असून त्यात त्याने आतापर्यंत 3 शतक जडले आहेत आणि दोन अर्धशतक काढले आहेत. आतापर्यंत त्याने 766 धावा काढल्या आहेत.
 • कुमार संघकारा ने आशिया कप मध्ये 24 सामने खेळले त्यापैकी 23 मध्ये त्याने फलंदाजी करत एकूण 4 शतक आणि 8 अर्धशतक पण काढले आहेत.
 • श्रीलंकेच्या सलामी फलंदाजाने, सनद जयसूर्या ने 25 सामन्या पैकी 24 इंनिंग मध्ये फलंदाजी करत एकूण 1220 रन्स काढले. यात त्याने 6 शतक आणि 3 अर्धशतक जडले. आशिया कप मधील हा आतापर्यंतचा सर्वात जास्त धावा काढणार खेळाडू आहे.
 • भारतीय खेळाडूंचा विचार केला तर सचिन तेंडुलकर हा सर्वात जास्त 971 धावा काढून पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी विराट कोहली असून त्याने 766 धावा काढल्या आहेत. गौतम गंभीर 573 धावा काढून तिसऱ्या स्थानी आणि महेंद्रसिंग धोनी 571 धावा काढत चौथ्या स्थानी आहे.
 • भारतीय गोलंदाजांचा विचार करता इर्फान पठाण याने सर्वात जास्त 22 गडी बाद केले असून तो पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर असून त्याने 17 गडी बाद केले आहेत. कपिल देव तिसऱ्या स्थानी असून 15 गडी बाद केले आहेत, आणि चौथ्या स्थानावर 14 गडी बाद करत आर. अश्विन आहे.

आशिया कप 2018 ची सामने 15 सप्टेंबर पासून सुरू होत आहेत.

 1. 15 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता दुबई येथे बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या दरम्यान होतं आहे.
 2. 16 सप्टेंबर रोजी दुबई येथे पाकिस्तान आणि हॉंगकॉंग यांच्या दरम्यान होणार आहे. आणि
 3. 17 सप्टेंबरला अबुधाबी येथे श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान होणार आहे.
 4. 18 सप्टेंबर रोजी दुबई येथे सामना भारत आणि हॉंगकॉंग दरम्यान होणार आहे.
 5. 19 सप्टेंबर रोजी दुबई येथे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना होईल.
 6. 20 सप्टेंबर रोजी अबूधाबी येथे बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान सामना होणार आहे, 21 तारखेपुढील सामने वरील सामन्यांच्या निकालावरून त्यांचे वेळापत्रक ठरवण्यात येईल.

या खेळात भारताच्या कर्णधारकडून म्हणजे रोहित शर्मा कडून लोकांची खूप अपेक्षा आहे. त्याचबरोबर तो उत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू असल्यामुळे त्याच्याकडून भारतीयांच्या खूप अपेक्षा आहेत. 2018 चा आशिया कप भारत जिंकणार यासाठी आपण भारतीय टीमला शुभेच्छा देऊया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here