भारत देश ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्रिकेट टोर्नमेंट खेळण्यासाठी भारतीय टीम ऑस्ट्रेलिया मध्ये गेली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये तीन टेस्ट होणार आहेत. त्यापैकी दोन टेस्ट मॅच झाले आहेत. पहिली टेस्ट मॅच भारताने जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाने बाजी सावरत दुसऱ्या टेस्ट मॅच मध्ये भारताचा पराभव केला. आता तिसऱ्या मॅच साठी दोन्ही टीम मध्ये लढत होणे बाकी आहे. तिसरी टेस्ट मॅच जिंकून ही सिरीज जिंकण्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरणार आहेत. त्या मॅचसाठी ऑस्ट्रेलिया ने नवीन खेळाडूला सामील करून घेतले आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा नवीन खेळाडू हा 7 वर्षाचा लहानसा मुलगा आहे. हा नवीन खेळाडू लेग स्पीनर असून त्याच नाव आर्ची सीचलर असं आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम मधला तो 15 वा सदस्य आहे.

आर्ची सीचलर याआधी एडिलेड मध्ये झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये सराव मॅच मध्ये भारताविरुद्ध खेळला होता. तेंव्हाच सीचलर तिसऱ्या टेस्ट मॅच मध्ये खेळणार हे फिक्स झालं होतं. तो तिसऱ्या टेस्ट मॅच मध्ये खेळणार आहे, याची घोषणा ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन टीम पेनने केली आहे.

आर्ची सीचलर हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम मध्ये सामील होणार आहे, याची घोषणा ऑक्टोबर महिन्यात झाली होती. तेव्हा UAE मध्ये पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया झालेल्या मॅच मध्ये तो खेळणार हे ठरवण्यात आलं होतं. तेंव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दौऱ्याच्या तारखा फिक्स झाल्या होत्या. तेंव्हा ऑस्ट्रेलियाच्या मुख्य प्रशिक्षकांनी सीचलर ला फोन करून कळवलं होतं की तू भारताविरुद्ध खेळणार आहेस आणि तुला विराट कोहलीला आऊट करायचं आहे.

आर्ची सीचलरची जीवन कहाणी खूपच हृदयद्रावक आहे. त्याच्या शरीरावर आतापर्यंत 13 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. एवढ्या छोट्याश्या शरीरावर एवढ्या शस्त्रक्रिया ऐकूनच वाईट वाटतं. तो तीन महिन्यांचा असल्यापासून त्याला हृदयाचा त्रास आहे. एवढ्या 13 शस्त्रक्रिया पैकी एक शस्त्रक्रिया ही ओपन हार्ट सर्जरी होती आणि ती तो केवळ तीन महिन्यांचा असताना करण्यात आली होती. त्याच्या जीवनातला बराचसा कालावधी त्याने हॉस्पिटलमध्ये घातला आहे.

आर्ची सीचलर हा अद्भुत क्रिकेटप्रेमी आहे. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या मुख्य प्रशिक्षकांनी म्हणजे जस्टीन लाँगर यांनी आर्ची सीचलर ला ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम मध्ये जागा दिली आहे. आर्ची च्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग आहेत आणि यातून प्रवास करत आहे. त्याचा बहुतेक वेळ त्याने बेडवर घालवला आहे. त्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आमच्याकडून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे, असं जस्टीन लाँगर म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here