भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांना गोलंदाजच कर्दनकाळ मानला जात असे, आपल्या पिढीतील दिग्गज खेळाडू म्हणून त्यांची ख्याती होती. तत्कालीन कर्णधार कपिल देव यांचा पाठिंबा आणि साह्य त्यांना सतत मिळायचे. या आपल्या कर्णधारची एका भारतीय खेळाडूंशी तुलना त्यांना आवडली नाही.

काही दिवसापासून क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची तुलना भारताचा दिग्गज व माझी कर्णधार कपिलदेवशी करण्यात येत आहे. मात्र हि तुलना लिटल मास्टर सुनील गावस्कर यांना रुचली नाही. या बाबत सुनील गावस्कर यांना मत विचारण्यात आले असता त्यावेळी ते म्हणाले “कपिल ची तुलना सध्याच्या संघातील कोणत्याही खेळाडूंशी होऊ शकत नाही ,कारण कपिल सारखा खेळाडू शतकातच एखादा असतो”. अश्या शब्दात त्यांनी कपिल देव यांची प्रशंसा केली.

श्रीलंके विरुद्धच्या झालेल्या मालिकेत भारताचा अष्टपैलू फलंदाज हार्दिक पांड्याची तुलना कपिल देवशी करण्यात आली होती.