जर कोणी एखाद्या क्रिकेट प्रेमीला प्रश्न विचारला की, सध्याचा क्रिकेट जगतातील सर्वोच्च खेळाडूंचे नावे सांगा, तर त्या यादीत ‘महेंद्रसिंग धोनीचे‘ नाव येणार नाही असं कधीच शक्य होणार नाही. त्या यादीमध्ये महेंद्रसिंग धोनीचे नाव हे टॉप वर असेल.

मागच्या 14-15 वर्षांत महेंद्रसिंग धोनीने क्रिकेट जगताला जे योगदान दिले आहे, त्याची आपण कल्पना ही करू शकत नाही. धोनीने आपली बॅटिंग असो, फिल्डिंग असो, विकेट किपिंग असो, कॅप्टन्सी असो प्रत्येक फिल्ड मध्ये सर्वोच्च स्थानी राहून आपल्या कौशल्याची जगाला ओळख करून दिली आहे.

प्रत्येक क्रिकेट प्लेअर धोनीची रिस्पेक्ट करतो. प्रत्येक खेळाडू हा धोनीच्या खेळाचा फॅन आहे. संपूर्ण क्रिकेट जगात सध्या क्रिकेट मधील अद्वितीय, आणि अद्भूत खेळाडू कोण आहे असे जर कोणी विचारले तर त्यात महेंद्रसिंग धोनी आणि AB De villiers यांचं सुद्धा नाव येणारच. De villiers ने नुकतंच क्रिकेट जगतातून रिटायरमेंट घेतली आहे, तर धोनी अजून खेळत आहे.

AB De villiers ला एका इंटरव्हूय मध्ये धोनी बद्दल विचारले असता, De villiers म्हणाला कि, “क्रिकेट मध्ये धोनी सारखा प्लेअर अजून तरी झाला नाही. मी स्वतः त्याचा मोठा फॅन आहे. कसल्याही परिस्थितीत आपला कुलनेस तो सोडत नाही. तो मरेपर्यंत असाच राहणार यात कसलीही शंका नाही. माझ्या ड्रीम क्रिकेट टीम बद्दल जर कोणी मला विचारलं तर धोनी हा त्यातला पर्मनंट प्लेअर असेल. तो जरी 80 वर्षांचा झाला किंवा जरी व्हीलचेअरवर असेल तरी तो माझ्या टीमचा पर्मनंट खेळाडू असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here