जकार्ता मध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धा मध्ये भारताकडून आत्तापर्यंत चांगली कामगिरी दिसून येत आहे, सात दिवसात भारताने सध्या सात सुवर्णपदकाची कमाई केली आहे, परंतु आठव्या दिवशी सुवर्णपदक जिंकण्याची संधी असताना देखील भारतीय खेळाडूंच्या हाती अपयश आले व त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

आशिया क्रीडा स्पर्धांच्या ४०० मीटर धावनी शर्यतीत भारताने २ रौप्य पदकाची कमाई केली आहे. महिलांच्या ४०० मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत हिमा दासने रौप्य पदक कमावले आहे. हिमा दासने ५०.७९ सेकेंद एवढ्या वेळेत स्पर्धा पूर्ण करून नवीन राष्ट्रीय विक्रमहि प्रस्थापित केला आहे. तसेच पुरुष गटाच्या अंतिम फेरीत मोहम्म्द अनसने ४५.४९ सेकंद एवढ्या वेळेत स्पर्धा पूर्ण करून रौप्य पदक आपल्या नावावर केले. भारताच्या लक्ष्मण गोविंद यानेही १० हजार मीटरच्या धावनी शर्यतीत तिसऱ्या स्थानावर येऊन कांस्य पदकाची कमाई केली असती परंतु लक्ष्मणचे पाऊल बाहेर समन्धित सीमेच्या बाहेर  पडल्यामुळे त्याला हे कांस्य पदक गमवावे लागले.

सध्या पदतालिकेत भारत ७ सुवर्णपदक, ९ रौप्यपदक आणि १९ कांस्य अशा ३५ पदकासह नवव्या स्थानावर आहे.