भारतीय खेळाडू हिमा दास यांनी जगभरात आपलं आणि देशाचं नाव चमकवल आहे. तिने अनेक जागतिक टोर्नमेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तिची ही कामगिरी पाहून भारत सरकारने तिला राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिमा दास एक धावपटू असल्यामुळे तिला लोकांनी प्रेमाने एक नाव दिलं आहे आणि ते म्हणजे ‘धिंग एक्सप्रेस‘. तसेच भारत सरकारच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीत तिला एक अधिकारी म्हणून पद दिले गेले आहे.

सोमवारी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या सार्वजनिक कंपनीने ही माहिती पब्लिश केली. हिमा दासचे या क्षेत्रातील कौशल्य वाढवण्यासाठी ही कंपनी तिच्या मदतीसाठी सदैव तत्पर असेल. हिमा दास आमच्या कंपनी सोबत जुडत आहे ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिमा दास या दोघांसाठी ही बाब खूप फायदेशीर ठरेल.

हिमा दासला कंपनीने ए ग्रेडचा मानव संसाधन अधिकारी(HR officer) म्हणून नियुक्ती केली आहे. भविष्यात हिमा दासीच्या यशात कंपनीचे नाव सुद्धा जोडले जाईल, त्यामुळे या बदल्यात कंपनी हिमा दासला वेतन आणि अन्य सुविधा पुरवेल.

जुलै मध्ये झालेल्या IAAF वर्ल्ड अंडर-20 चॅम्पियनशीप स्पर्धेत महिला 400 मी गटात तिने सुवर्णपदक पटकावले होते. तसेच ती ट्रॅक स्पर्धेत महिला आणि पुरुष दोन्ही गटात सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला आहे. यावर्षी झालेल्या आशियाई गेम्स स्पर्धेत तिने एक सुवर्णपदक आणि दोन रौप्यपदक पटकावून भारताचे नाव उंचावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here