• भारतात फळांचा राजा आंबा, आणि खेळाचा राजा क्रिकेट म्हटले तर वावगं ठरणार नाही. जागतिक श्रेणीतील अनेक क्रिकेटपट्टू भारतीय आहेत. लोकांच्या करमणूकी साठी या खेळात अनेक बदल केले गेले. टेस्ट क्रिकेट ते वन-डे ते २०२० आणि आता IPL. 
  • भारताची लोकसंख्या १.३ Billion आहे या मधील ८०० Million लोकसंख्या हि क्रिकेट बघते. आणि जर भारत-पाकिस्तान मॅच असेल तर हा आकडा आरामात पार होतो. आता तुमच्या कडे जर इतका मोठा Dedicated fan base असेल तर करमणूक हि त्या तोला-मोलाची हवी. 
  • आपण बघतो कि हा आमुक खेळाडू इतक्या कोटी ला गेला. आणि या संघात इतक्या कोटी चे इतके खेळाडू.  पण कधी या मागचे अर्थकारण समजण्याचा प्रयत्न केला आहे का? इतके महाग खेळाडू विकत घेणे त्या संघाला कसे परवडत असेल कारण IPL  हि कोणती Non Profit Organisation नाही. संघ विकत घेणारे आपल्या करमणूकी वर तुफान पैसे कमावतात.  

या आर्टिकल मधून आज आपल्याला अश्या गोष्टी कळणार आहेत ज्यातून संघ मालक अथवा Franchise पैसे कमावतात. 

चला तर मग सुरु करूयात!!!

भाग भांडवल (stake) विकून

IPL मध्ये तुमच्या टीम चे काही ठराविक शेअर हे दुसर्यांना विकून भरपूर पैसे कमावला जातो. आता याला जरा उदाहरणा सोबत पाहू, GMR ने त्यांच्या IPL मधील टीम Delhi capitals (Delhi daredevils हे पूर्वीचे नाव) मधील ५०% भाग हा JSW Group ला ५५० करोड ($७७ Million) रुपये ला विकला. हि टीम GMR ने काही वर्षा पूर्वी ८४ Million ला विकत घेतली होती. या वरून असे कळते कि GMR ने काही दशकातच गुंतवलेल्या रकमेची दाम दुप्पट केली. 

Merchandising

Merchandising म्हणजे खेळात वापरण्यात येणाऱ्या बॅट्स, Jerseys आणि इतर साहित्य यांच्या Companis मधून मिळणारे उत्पन्न. सध्या उत्पन्नाचा विचार केला तर या क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न इतर क्षेत्रांपेक्षा जरी कमी असले तरी भविष्यात भरपूर Scope आहे. 

बक्षिसाची रक्कम

यात काहीच वाद नाही कि सर्व Franchises या जिंकण्यासाठीच खेळतात. मागील वर्षीचे विजेते मुंबई इंडियन्स यांना २० करोड रुपये इतके Winning price भेटले. आता तुम्ही म्हणाल कि IPL मध्ये विराट कोहली ने १७ करोड कमावले होते. हे बरोबर आहे कि Price कमी आहे मात्र जिंकल्यामुळे Brand valu सुद्धा वाढते. त्यामुळे जिंकणाऱ्या Franchise ची वळून वाढते आणि हवे ते Brands हवे त्या किमतीत भेटून जातात. 

आता आपण २०१८ च्या संघांची Brand value किती होती ते पाहुयात. 

माध्यमांच्या अधिकारातून.  

क्रमांक संघ Brand value (कोटी रुपये)
1 मुंबई इंडियन्स  782
2 कोलकाता कनाईट रायडर्स  720
3 रॉयल चालेंजर्स बेंगुळुरु  678
3 चेन्नई सुपर किंग्स 678
5 सनराईझर हैद्राबाद   484
6 दिल्ली कॅपिटल  360
6 किंग्स XI पंजाब  360
8 राजस्थान रॉयल्स  297

 

आपण हे समजून घेतले पाहिजे कि Brand value हि फक्त जिंकल्यामुळे वाढत नाही तर संघातील खेळाडूंवर सुद्धा अवलंबून असते. 

माध्यमांच्या अधिकारातून

प्रसार मध्यम IPL ब्रॅण्डला मोठे आर्थिक योगदान देतात. २०१७ साली स्टार इंडिया ने IPL चे Broadcasting rights घेण्यासाठी तब्बल १६,३४७ करोड रुपये मोजले. प्रति मॅच चे ५४.५ करोड रुपये. स्टार इंडिया ला हे परवडले कारण Advertise देणार्यांनी त्यांना Approach केले आणि Viewership revenue भेटला. 

तसेच काही Special shows मधून सुद्धा पैसे कमावतात जसे  KKR’s Knight club आणि इतर. 

तिकीट विकून/Gate revenue 

प्रत्येक Franchise अथवा टीम च्या ७ Mactechs या त्यांच्या Home ground वर असतात. प्रत्येक तिकीट आणि पास वर त्या-त्या Franchise चा पूर्ण अधिकार असतो. प्रत्येक मोठया Match मुळे  होणार फायदा हा मोठा असतो. यात एक गोष्ट लक्षात घेण्या सारखी आहे कि या आर्थिक व्यवहारात Franchise स्वतः सहभाग घेते. 

प्रयोजकता (sponsors) मधून

जर सर्वात  महत्वाचे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणायचे झाले तर ते आहेत स्पॉन्सर्स. संघ काही ठराविक Brands सोबत करार करतात आणि त्यांच्या ब्रँड चे प्रोमोशन हे त्यांचे लोगो असलेल्या Jerseys घालून अथवा TV Add मधून करतात. या प्रोमोशन चे Franchise ला बक्कळ पैसे भेटतात. 

आजच्या आर्टिकल मध्ये इतकच. तुम्हाला जर काही अभिप्राय, सूचना, प्रश्न, कॉमेंट्स असतील तर आम्हाला नक्की कळवा या साठी तुम्ही खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स चा वापर करू शकता. अशीच माहिती मराठी मधून मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉग  ला भेट देत राहा.