जकार्ता मध्ये चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा मध्ये भारतीय हॉकी टीमचा रोमांचकारी सेमीफायनल मध्ये मलेशिया कडून पराभव झाला आहे. साखळी सामन्यांमध्ये ७६ गोलचा विक्रमी पाऊस पाडूनही उपांत्यपूर्व सामन्यात मलेशिया कडून पराभव पत्करावा लागला. कब्बडी व हॉकी या दोन्ही खेळामध्ये २ सुवर्ण पदक हक्काचे मानले जायचे परंतु दोन्ही खेळांमध्ये भारताला उपांत्यपूर्व सामन्यात पराभव पत्करावा लागलं आहे.

गुरुवारी मलेशियाभारतामध्ये झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताला मलेशियाकडून पेनल्टी शूटआऊटवर 6-7 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताला सुवर्ण पदकाला मुकावे लागले व त्याचबरोबर ऑलिम्पिक फायनल ची संधी गमावल्यामुळे टोकियो मध्ये होणाऱ्या २०२० च्या ऑलिम्पिकच्या प्रवेशाची थेट संधी हि गमावली आहे.

गुरुवारी झालेला हा सामना भारतीय खेळाडूंकडून अपेक्षेप्रमाणे चांगला खेळला जात होता. मध्यांतरापर्यंत दोन्ही टीम कडून आक्रमक खेळ चालू होता, परंतु दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे मध्यांतरापर्यंत सामना ०-० असा बरोबरीत होता मध्यांतरानंतर लगेचच तिसऱ्या मिनिटाला भारताच्या हरमनप्रीतने गोल करत संघाला १-० आघाडी मिळवून दिली. परंतु मलेशियन खेळाडू फैसल सरीने प्रत्युत्तरात ४० व्या मिनिटाला गोल करत आपल्या टीम ला बरोबरीत आणले.  मलेशियाचा हा आनंद काही सेकंदच टिकला कारण लगेचच भारताच्या वरून कुमार ने गोल करत सामना भारताच्या बाजूने झुकवला व सामन्यात रंगत आणली. खेळ शेवटच्या काही टप्य्यात आला होता आणि सामना भारत जिंकणार व फायनल गाठणार असे चित्र दिसत होते मात्र असे असताना मलेशियाचा खेळाडू मोहम्मद रहीम याने अखेरच्या मिनिटाला गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला.

शेवटच्या मिनिटांपर्येंत सामना 2-2 असा बरोरीत राहिल्यामुळे पेनल्टी शूट आऊट घेण्यात आली. यात मलेशियाकडून सात खेळाडूंनी गोल केले तर भारताकडून फक्त सहा खेळाडूंनाच गोल करता आला. त्यामुळे मलेशियाला विजयी घोषित करण्यात आले व थेट फायनल मध्ये जाण्याची संधी मिळाली. आता कांस्यपदकासाठी भारताचा शनिवारी सामना होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here