सध्या भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असला तरीही २०१९ साली भारतीय संघाच्या पहिल्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. नवीन वर्षात भारत आपल्या क्रिकेट दौऱ्याची सुरुवात न्यूझीलंडमधून करणार आहे. २३ जानेवारी २०१९ पासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून, यामध्ये भारत ५ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने आज भारताच्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २०१८ च्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे, यानंतर अवघ्या काही दिवसांच्या कालावधीमध्येच भारतीय संघाला न्यूझीलंडला रवाना व्हावं लागणार आहे.

असं असेल भारतीय संघाचं न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक –

पहिली वन-डे : २३ जानेवारी २०१९ (नेपियर)
दुसरी वन-डे : २६ जानेवारी २०१९ (माऊंट मॉनगनुई)
तिसरी वन-डे : २८ जानेवारी २०१९ (माऊंट मॉनगनुई)
चौथी वन-डे : ३१ जानेवारी २०१९ (हॅमिल्टन)
पाचवी वन-डे : ३ फेब्रुवारी २०१९ (वेलिंग्टन)
पहिली टी-२० : ६ फेब्रुवारी २०१९ (वेलिंग्टन)
दुसरी टी-२० : ८ फेब्रुवारी २०१९ (ऑकलंड)
तिसरी टी-२० : १० फेब्रुवारी २०१९ (हॅमिल्टन)

तसेच भारतीय महिला संघ पण न्यूझीलंड दौऱ्यावर असणार आहे. महिला टीम ३ एकदिवसीय सामने आणि अनेक टी २० सामने खेळणार आहेत.

न्यूझीलंडचे घरेलू दौरा दोन कसोटी सामने श्रीलंका विरुद्व सुरूवात होईल, दिनांक २६ डिसेंबर २०१८ पासून सुरूवात होणार आहे. श्रीलंका डिसेंबर सुरूवाती मध्ये सराव सामन्यासाठी न्यूझीलंडमध्ये प्रदार्पण करेल. त्यात यजमान ३ एकदिवसीय आणि १ टी २० सामान्याचे आयोजन करणार आहे.

असं असेल श्रीलंका संघाचं न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक –

पहिली कसोटी : १५ ते १९ डिसेंबर (वेलिंग्टन)
दुसरी कसोटी : २६ ते ३० डिसेंबर (क्राइस्टचर्च)
पहिली वन-डे : ०३ जानेवारी २०१९ (माउंट मौनगानु)
दुसरी वन-डे : ०५जानेवारी २०१९ (माऊंट मॉनगनुई)
तिसरी वन-डे : ०८ जानेवारी २०१९ (नेल्सन)
फक्त एक टी-२० : ११ जानेवारी २०१९ (ऑकलंड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here