जकार्ता मधील आशियाई खेळ, २०१८ मध्ये कुरष् पहिल्यांदा खेळला जातोय. कुरष् हा मूळ शब्द तुर्कीष आहे आणि एक प्रकारच्या कुस्त्यांना संबोधण्यासाठी वापरला जातो. हा एक स्थानिक लोक कुस्ती खेळ आहे आणि तो मूलतः सेंट्रल आशियाई देशामध्ये दिसतो. पहिल्यांदा अधिकृतपणे या खेळाची ‘All-USSR Championship’ ने १९२८ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर हा खेळ संपूर्ण जगाला माहीत झाला. नंतर अशी बरीच टोर्नमेंट होत गेली. आंतरराष्ट्रीय कुरष् संघटना , १९९८ मध्ये स्थापन झाली. या संघटनेचा मुख्यालय ताश्कंद, उझबेकिस्तान मध्ये आहे.

कुरष् कुस्ती प्रकारात प्रतिस्पर्धी टॉवेल जो की त्यांच्या कमरेभोवती गुंडाळलेला असतो त्याच्या साहाय्याने एकमेकांना जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न करतात.

आशियाई खेळ, २०१८ मध्ये हा खेळ पहिल्यांदाच खेळला जातोय आणि त्यात भारताने दोन, रुपेरी आणि कांस्य पदक पटकावले आहेत. भारताच्या पिंकी बल्हारा हिने रुपेरी तर मालप्रभा जाधव हिने कांस्य पदक जिंकले आहे, त्या अनुक्रमे नेब सराय, दिल्ली आणि बेळगांव, कर्नाटकाच्या आहेत. सोनेरी पदक उझबेकिस्तानची गुलनोर सुलयमानोवा हिने पटकावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here