अष्टपैलू क्रिकेटर इरफान पठाण यांनी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट मधून रिटायर होत असल्याची बातमी शनिवारी जाहीर केली. त्याच्या दुखापतग्रस्त करीअरने त्याला त्याचं खरं पोटेनशीअल काय आहे, हे ओळखू न देताच त्याची कारकीर्द संपली.

35 वर्षीय क्रिकेटपटू अपेक्षेप्रमाणे रिटायरमेंट घेतली. त्याने त्याची शेवटची मॅच फेब्रुवारी 2019 मध्ये खेळली होती आणि ती सुद्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याकडून.

2018 पासून जम्मू आणि काश्मीरकडून खेळण्यापूर्वी इरफान पठाण यांनी आपलं संपूर्ण स्थानिक खेळ बडोदा कडूनच खेळलं आहे.

इरफान पठाण याने मागच्या 12 महिन्यापासून कोणताही सामना खेळला नाही. तसेच त्याने मागच्या महिन्यातील IPL साठी होणाऱ्या बोली मधून ही स्वतःला बाहेर ठेवलं.

इरफान पठाण ने आपली पहीली आंतरराष्ट्रीय मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध Adelaide Oval मध्ये 2003 साली खेळली होती. त्यावेळी तो फक्त 19 वर्षांचा होता.

त्याच्या गोलंदाजीत कधीच जास्त गती नव्हती पण त्याची उजव्या फलंदाजसमोर बॉल स्विंग करण्याच्या नैसर्गिक कौशल्यामुळे त्याला अमूल्य यश प्राप्त झाले. इतकेच नाही तर त्याची तुलना कपिल देव सोबत केली जात होती. असं म्हटलं जायचं की भारताला कपिल देव नंतर ज्या अष्टपैलू क्रिकेटरची वाट पाहावी लागत होती, ती इरफान पठाण आल्यामुळे पूर्ण झाली.

ऑक्टोबर 2012 माधव शेवटच्या वेळेस भारतासाठी इरफान पठाण खेळला होता. त्याने 29 टेस्ट सामने खेळले त्यात त्याने 1105 रन्स काढले व 100 विकेट घेतले.

त्यांनंतर त्याने 120 एकदिवसीय सामने खेळले. त्यात 1544 रन्स तर 173 विकेट घेतले.

व शेवटी 24 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले. त्यात त्याने 172 रन्स तर 28 विकेट घेतले.

त्याची 2003-04 मधील स्पेल खूप फेमस आहे. त्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या दोन मुख्य फलंदाज Steave Waugh आणि Adam Gilchirst यांचा बळी घेतला होता. परंतु तो सामना ड्रॉ झाला.

जेंव्हा भारताने 2007 चा T20 विश्वकप जिंकला त्यावेळी तो टीमचा मुख्य गोलंदाज होता. पाकिस्तान विरुद्धच्या फायनल मध्ये इरफान पठाण मॅन-ऑफ-द-मॅच राहिला होता.

त्यांची 2006 मधील पाकिस्तान विरुद्ध खेळली मॅच सुद्धा अविस्मरणीय आहे. हरभजन सिंग नंतर टेस्ट क्रिकेट मध्ये हॅट्रिक करणारा इरफान पठाण होता. पाकिस्तानच्या सलमान भट्ट, युनूस खान आणि मोहम्मद युसूफ या तीन खेळाडूंना बाद करून त्याने हॅट्रिक केली होती.

2008 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना पर्थसारख्या अवघड पिचवर खेळून भारताला विजय मिळवून दिला होता.

दुखापत आणि खराब कामगिरीमुळे त्याच करिअर पुढे धोक्यात आलं. त्याची स्विंग करण्याची क्षमता सुद्धा खचत गेली. परंतु मागच्या 2 वर्षांपासून इरफान पठाण क्रिकेट मध्ये कमेंट्री करत आहेत आणि भविष्यात ही त्याने क्रिकेटमधेच अनेक प्लॅन केले आहेत. त्याचे सोबती त्याला पुढील वाटचाली साठी सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत.

हरभजन सिंगने सुद्धा त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दिगग्ज क्रिकेटपटू VVS Laxman याने सुद्धा खालील प्रमाणे शुभेच्छा दिल्या आहेत.