cricket-stadium-lucknow

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनऊ मधील पहिल्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच झालं उद्घाटन. हे स्टेडियम खेळ प्रेमींना समर्पित करताना योगिनीं स्टेडियम प्रबंधकाना आणि शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या. उद्घाटन करताना मुख्यमंत्री म्हणाले, या स्टेडियममुळे या भागात युथ खेळाला प्रोत्साहन मिळेल. त्या स्टेडियमला अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असं नाव देण्यात आलं आहे.

तिथे जमलेल्या लोकांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की मागच्या काही दिवसांपासून या स्टेडियमच्या नावाला घेऊन खूप चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. कोणाच्या नावावरून या स्टेडियम चे नाव ठेवावे, हा प्रश्न अनेकांना पडला होता. अटल बिहारी वाजपेयीनी लखनऊसाठी खूप काही केलं आहे. अशात त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं नाव आपण या स्टेडियमला देऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी खेळ प्रेमींना या स्टेडियमचा मनसोक्त फायदा घेण्यासाठी अपील केली. त्यांनी म्हटलं की एखादा खेळाडू हा त्याच्या देशासाठी खेळत असतो.

या उद्घाटन समारंभात UPCA चे चेअरमन राजीव शुक्ला सुद्धा उपस्थित होते. राजीव शुक्ला म्हणाले की लखनऊ मध्ये आंतरराष्ट्रीय खेळ होणे ही खूप सौभाग्याची गोष्ट आहे. या स्टेडियमला ICC ने भारतातील आतापर्यंतचा सर्वात उत्तम स्टेडियम असल्याचं म्हटलं आहे. हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय मानकावर 100% खरं उतरलं आहे. तसेच राजीव शुक्ला म्हणाले की पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये UPCA आणखी एक आंतरराष्ट्रीय स्टेडियमसाठी जमीन खरेदी केली आहे. लवकरच त्याचं भूमिपूजन ही केलं जाईल. ते पुढे म्हणाले की उत्तर प्रदेश सरकार खेळाच्या महत्वाला समजत आहे आणि त्याच्यासाठी कामही करत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशाप्रमाणेच पूर्वी उत्तर प्रदेशात ही आशा प्रकारच आंतरराष्ट्रीय स्टेडियम व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही ते म्हणाले.

उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण स्टेडियम ची पाहणी केली आणि झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की आज प्रदेशात दोन मोठ्या घटना घडत आहेत. एक पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय T-20 मॅच येथे होत आहे आणि दुसरी अयोध्येत पहिल्यांदा मोठा दीपोत्सव साजरा केला जातोय. उत्तर प्रदेशासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here