धोनीने चेन्नई सुपर किंग्ज ला २०२१ साठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी करण्यात यावे अशी परवानगी मागितली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज कडून अगदी आयपीएल च्या सुरुवाती पासून धोनी खेळत आला आहे. अपवाद फक्त दोन वर्षांचा. त्यावेळेची चेन्नई सुपर किंग्ज ला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते, तेव्हा धोनी रायझिंग पुणे सुपर जायंट या संघाकडून खेळला होता.

सीएसके वरील निलंबन संपल्यानंतर पुन्हा धोनी या संघात परतला होता. व त्या वर्षीचे आयपीएलचे विजेतेपद मोठ्या दिमाखात सीएसके ने त्यांच्या खिशात घातले होते. शिवाय यावर्षी  महेंद्र सिंग धोनी च्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत सीएसके पोहोचली होती.
आत्ता पर्यंत धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. शिवाय गेल्या १२ वर्षात धोनीचे सीएसके के सोबत एक वेगळेच नाते निर्माण झालं आहे. चेन्नई मध्ये धोनीचे खूप मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. धोनीला हे चाहते ‘थाला’ या नावाने संबोधित करतात. सीएसके च्या चाहत्यांचा धोनीवर प्रचंड विश्वास असून आत्तापर्यंत धोनीने मैदानावर केलेल्या खेळीने हा विश्वास सार्थ ठरविला आहे.

पण सूत्रांच्या माहितीनुसार २०२१ मध्ये धोनी दुसऱ्या टीम साठी खेळू शकतो. खरं तर चेन्नई सुपर किंग्ज शिवाय इतर संघामध्ये धोनी ही कल्पनाच आपल्याला करवत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३८ वर्षीय धोनीने आपण २०२१ मध्ये आयपीएल खेळणार आहोत पण दुसऱ्या संघाकडून आपल्याला खेळायला आवडेल असं धोनीने सांगितले आहे. शिवाय २०२१ साठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी आपल्याला मुक्त करावं असे धोनीने चेन्नई सुपर किंग्जला सांगितले आहे.

२०२१ साठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावा मध्ये धोनीला जास्त पैशांची बोली लागू शकते, यासाठी त्याने चेन्नई सुपर किंग्ज कडे अशी मागणी केल्याचे समजते. परंतु चेन्नई सुपर किंग्ज कडे असणाऱ्या ‘राईट टू मॅच कार्ड’ द्वारे ते पुन्हा धोनीला नव्याने विकत घेऊ शकतात.
त्यामुळे २०२१ मध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळणार कि नाही हा प्रश्न पुढील काही दिवसांसाठी अनुत्तरीतच राहीन.

तत्पूर्वी धोनी पुनरागमन कधी करणार असं त्याला वारंवार विचारलं जातंय . त्यावर काल २७ नोव्हेंबर २०१९ रोजी एका पत्रकार परिषदेत ‘जानेवारी पर्यंत मला काहीही विचारू नका’ असं खुद्द धोनीनेच सांगितले आहे. सध्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून घेतलेल्या विश्रांती मुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. ६ डिसेंबर पासून वेस्ट इंडिज सोबत होणाऱ्या एकदिवसीय  सामन्यांच्या मालिकेसाठी सुद्धा धीनी अनुपलब्ध आहे. पण काहीच दिवसांपूर्वी धोनी झारखंड या राज्याच्या संघासमवेत सर्व करताना आढळला होता. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीच्या पुनरागमनाची चर्चा सुरु झाली आहे.