पृथ्वी शॉ या सर्वात लहान तरुण खेळाडूने आपल्या पहिल्याच टेस्ट क्रिकेट मॅच मध्ये 100 पेक्षा जास्त रन काढून रेकॉर्ड बुक मध्ये आपले नाव लिहिले आहे. आपल्या पहिल्याच टेस्ट मॅच मध्ये 100 पेक्षा जास्त रन काढणारा एवढ्या लहान वयाचा तो पहिलाच भारतीय आहे. आपल्या उत्तम परफॉर्मन्सने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

  • वेस्ट इंडिज विरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळताना पृथ्वी शॉ ने या मॅच मध्ये एकूण 154 बॉल खेळले आणि एकूण 134 रन्स काढले. भारतीयांची मने त्यांनी जिंकली.
  • भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टेस्ट मॅच सिरीज होत आहे. आजची मॅच राजकोट येथे होत असून दोन्ही टीम उत्कृष्ट रीतीने खेळत आहे.
  • पृथ्वी शॉ हा 18 वर्ष 329 दिवस वयाचा मुलगा आहे. त्याने अली अब्बास बैग याचा रेकॉर्ड तोडला आहे.
  • 1959 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना अली अब्बास बैग याने 112 रन्स काढले होते, त्यावेळी त्याचे वय 20 वर्षे आणि 131 दिवस एवढे होते.
  • ESPN च्या रिपोर्टनुसार भारतासाठी टेस्ट मॅचमध्ये खेळणारा पृथ्वी शॉ हा 13 वा सर्वात लहान भारतीय खेळाडू आहे.
  • टेस्ट मॅच मध्ये पहिला बॉल खेळणारा पृथ्वी शॉ हा जगातला चौथा सर्वात लहान खेळाडू झाला आहे.

भारताने नुकताच 19 वयोगटा खालील वर्ल्ड कप जिंकला आहे. या वर्ल्ड कप टोर्नमेंट मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ होता. या दौऱ्यावर असताना भारतीय संघाने अतिशय उत्तम अशी खेळी सादर केली.

पृथ्वी शॉ याने केलेल्या या कामगिरी बद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले आहे. त्यात व्ही. एस. लक्ष्मण, सेहवाग यांचा समावेश आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here