जकार्तामध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये चौथ्या दिवशी पुन्हा एकदा नेमबाजांनी भारतासाठी पदकाची कमाई केली आहे. २५ मी. पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनौबतने सुवर्णपदकाची कमाई केली. यासोबतच नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारी राही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

पहिल्या फेरीपासून सर्वोत्तम खेळ करत राहीने आपलं अव्वल स्थान कायम राहिलं होतं. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं. अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण समान झाले, त्यामुळे सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये शूटऑफवर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूटऑफमध्येही दोन्ही खेळाडूंचे ४-४ गुण झाल्यामुळे दुसऱ्यांदा शूटआऊटवर सामना खेळवण्यात आला. या शूटऑफवर राहीने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं.

१६ वर्षीय नेमबाज मोनू भाकरनेही याच प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता, मात्र यात तिला यश आले नाही. पात्रता फेरीत अव्वल दर्जाची कामगिरी करत पहिलं स्थान कायम राखलेल्या मनूला अंतिम फेरीत चांगली कामगिरी करता आली नाही. राहीच्या पदकाबरोबर भारताच्या खात्यात आत्तापार्येंत ४ सुवर्णपदकाची भर पडली आहे. सध्या भारत पदकतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here