प्रोफेशनल रेसलर Roman Reigns यांनी रेसलींग रिंगला इमोशनल होऊन गुडबाय केले. आपल्याला 11 वर्षांपूर्वी झालेला ल्युकेमिया आता परत बळावला असल्यामुळे त्यांनी रेसलींग सोडत असल्याचे इमोशनल होऊन सांगितले.

Roman Reigns ज्यांचे पूर्ण आणि खरे नाव Leati Joseph Anoaʻi आहे त्यांनी, प्रॉव्हिडन्स, ऱ्होडे बेटावर, होत असलेल्या ‘WWW Raw’ एपिसोड मध्ये Chanpionship Belt ला ट्रीटमेंटमुळे सोडत असल्याची माहिती, सर्वांना सांगितली.

रोमन प्रेक्षकांना बोलताना म्हणाला, ” माझं खरं नाव जो आहे आणि मी 11 वर्षांपासून ल्युकेमिया पासून झगडत आहे परंतु दुर्दैवाने त्याने आताच डोके वर काढले आहे. त्यामुळे मी आता फायटिंग चॅम्पियन राहिलो नाही. मला ल्युकेमिया झाल्यामुळे ट्रीटमेंट साठी मला हे चॅम्पियनशीप बेल्ट इथेच सोडून जावं लागत आहे. मी येथें फाईट करू शकत नाही याचे मला फार दुःख आहे.”

मी तुम्हाला खोटं बोलणार नाही, मी तुम्ही पाठवलेले सर्व सदिच्छा आणि प्रार्थनाचा सन्मान ठेवेन, परंतु तुमच्या कडून सहानुभूती मिळावी अशी माझी इच्छा नाही, तुम्ही माझ्यासाठी वाईट वाटून घ्यावे असे मला वाटत नाही, कारण माझा तुमच्यावर विश्वास आहे.” असंही तो म्हणाला.

रोमन हा Georgia Tech चा माजी फुटबॉल पटू आहे आणि नंतर त्याने 8 वर्ष रेसलींग मध्ये काम केले आणि एक प्रभावी फायटर म्हणून तो प्रसिद्ध झाला. तो 22 वर्षांचा असताना पहिल्यांदा ल्युकेमिया त्याच्या मध्ये डिटेक्ट झाल आणि आता 11 वर्षानंतर पुन्हा त्याने डोके वर काढले.

Image Courtesy – WWE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here