सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग हे मैदानावरील अतिशय उत्कृष्ट ओपनिंग बॅट्समन होते, त्यासोबतच ते अतिशय जवळचे मित्र सुद्धा आहेत. त्यामुळेच सचिन तेंडुलकरने आपल्या लाडक्या मित्राच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त एक अतिशय उत्कृष्ट पोस्ट ट्विटर वर टाकली आहे.

सचिन ने केलेल्या ट्विट मध्ये, “141.211416441116464 Not a GPS location, but the way my friend @virendersehwag used to smash runs! Happy Birthday, ‘Veer’u!,” असा सुंदर मॅसेज लिहिला आहे. यात सचिन म्हणतोय की, ट्विट मधील जो विचित्र नंबर हे कुठलं GPS लोकेशन नसून माझा प्रिय मित्र कशा प्रकारे खेळाची सुरुवात करतो त्याचं ते उदाहरण आहे.

सचिन तेंडुलकरच्या या ट्विट वर वीरेंद्र सेहवाग ने सुद्धा अतिशय सुंदर रिप्लाय दिला आहे, त्याने, “∞ , not just a symbol, but when it came to scoring runs, that’s how much our God ji @sachin_rt scored. असं ट्विट करत रिप्लाय दिला आहे. ट्विट च्या सुरुवातीस जे चिन्ह आहे त्याला इंफिनिटी असे म्हणतात, याचाच अर्थ ‘अमर्याद’ असा होतो.

सचिन आणि सेहवाग यांची ओपनिंग जोडी 2002-12 या कालावधीत खूप गाजली होती. या दोघांची पार्टनरशिप हि 93 इनिंग्ज मध्ये 3919 इतक्या धावांची आहे आणि त्यांचा स्ट्राईक रेट 42.13 एवढा होता.