बीसीसीआयने २००८ साली इंडियन प्रीमियम लीगची स्थापना केली. तेंव्हापासून सुरु असलेल्या या व्यावसायिक टी-ट्वेंटी स्पर्धेने जगभरातील क्रिकेट वेड्या रसिकांचे अपार मनोरंजन केले आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून सुरु झालेल्या या स्पर्धेला रसिकांचीही मोठी दाद मिळते.

या स्पर्धेत भारतातील आठ मोठ्या शहरांचे प्रतिनिधित्व करणारे एकूण आठ संघ सहभागी असतात. दरवर्षी मार्च किंवा एप्रिल आणि मे च्या दरम्यान या स्पर्धा भरवल्या जातात. इतर कोणत्याही क्रीडास्पर्धेच्या लीग पेक्षा भारताच्या या लीगने जगभरात अल्पावधीत आपला दबदबा निर्माण केला. या स्पर्धेने क्रिकेटमधील सर्वोत्तम दर्जा कायम राखला आहे. २००८मध्ये जेंव्हा या स्पर्धांना सुरुवात झाली तेंव्हा मुंबई संघ हा सर्वात महागडा संघ होता, ज्यासाठी १११.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी बोली लावण्यात आली होती. पहिल्यांदा जेंव्हा या स्पर्धेसाठी बोली लावण्यात आली तेंव्हा एम. एस. धोनीने १.५ दशलक्ष अमेरिकन डॉलरची सर्वात महागडी बोली जिंकली होती. त्यावेळी धोनी चेन्नई संघाचा खेळाडू होता आणि या संघाची एकूण बोली होती ५ दशलक्ष अमेरिकन डॉलर. अँड्र्यू सायमंड हा सर्वात महागडा परदेसी खेळाडू ठरला ज्याने १.३५ दशलक्ष इतकी बोली जिंकली होती. २००८ मध्ये झालेल्या लिलावात सर्व फ्रँचायजींची रक्कम ७२३.५९ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी झाली होती.

गेल्या वर्षी विराट कोहलीला १७ कोटी रुपयांचे मानधन मिळाले. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी रक्कम ठरली. आत्ता आयपीएलचा लिलाव जर नव्याने सुरु केला तर आठही फ्रँचाईजीसाठी हे पाच खेळाडू सर्वात महागडे खेळाडू ठरतील.

१) विराट कोहली

विराट कोहलीच्या अप्रतिम फलंदाजीने जगभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये त्याला एक अव्वल स्थान मिळवून दिले आहे. जगभरतील क्रिकेट रसिक त्याला “रन मशीन” म्हणूनच ओळखतात. या खेळातील त्याची प्रगती देखील उल्लेखनीय आहे. २०१६ च्या आयपीएलमध्ये त्याने ९७३ धावा केल्या होत्या, सर्व सिझन मधील फलंदाजांनी केलेल्या एकूण धावांपैकी या धावा सर्वात जास्त आहेत. मर्यादित शतकांमध्ये कितीही धावांच्या आव्हानांचा पाठलाग करण्याची त्याची गती पाहता या लिलावात या खेळाडूवर अधिकाधिक बोली लागण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या १६९ इनिंग्ज मध्ये विराटने ५४१२ धावा केल्या असून, त्याचा अव्हरेज स्कोअर ३७.८५ आहे.

२) जसप्रीत बूमराह

जसप्रीतने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्समधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. गुजरातमधून आलेला जसप्रीत वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. पहिल्याच सामान्या दरम्यान खेळाच्या अगदी कसोटीच्या क्षणी आपल्या गोलंदाजीची विशिष्ट क्षमता वापरणाऱ्या रोहित शर्मावर आपला छाप सोडण्याची संधी जसप्रीतने अजिबात गमावली नाही. टी-ट्वेंटी मध्येही त्याने आपल्या सर्वोत्तम गोलंदाजीची क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. जसप्रीत सारखा हरहुन्नरी गोलंदाज आपल्या संघात असलाच पाहिजे असे कोणत्याही कप्तानला वाटू शकते. म्हणून या आयपीएलमध्ये जसप्रीतही अधिक बोली असणारा खेळाडू ठरला असता.

यापूर्वीच्या आयपीएलमध्ये जसप्रीतने ७७ इनिंग्ज मध्ये ८२ विकेट घेतल्या आहेत.

३) ए बी डिव्हीलियर्स

या मी. ३६० ने आयपीएल मध्ये सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी केली आहे. समोरच्या चेंडूची गती ओळखत फलंदाजांची आक्रमक खेळी रोकाण्याचे अप्रतिम कौशल्य असलेला, डिव्हीलियर्स उत्तम फलंदाज आहे. या पूर्वी तो दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी खेळला आहे, त्यानंतर रॉयल चॅलेन्जर्स बेंगळूरूसाठी देखील तो खेळला आहे. या लिलावात डिव्हीलियर्स सारख्या सर्वोत्तम फलंदाजासाठी लावली जाणारी बोली देखील उच्चतम असेल.

यापूर्वीच्या आयपीएलमध्ये डिव्हीलियर्स १४२ इनिंग्ज आणि ४३९५ धावा केल्या आहेत.

४) अँद्रे रसेल

View this post on Instagram

Let’s do this! #windiescricket

A post shared by Andre Russell🇯🇲 (@ar12russell) on

गेल्या सिजनमध्ये त्याने बंगळूरू विरुद्ध खेळलेल्या सामन्यात अगदी हातातून निसटत चाललेली मॅच खेचून आणली. षटकार मारण्यातील त्याचा हातखंडा वाखाणण्याजोगा आहे. यापूर्वी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स साठी खेळत होता, त्यानंतर त्याने कोलकाता नाईट रायडर्समध्येही सहभाग घेतला. इंडियन प्रीमियम लीग मधील अँद्रेचा प्रवास अतिशय रोचक ठरला आहे, ज्यामध्ये त्याने भरपूर धावा आणि विकेट देखील घेतल्या आहेत. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच आघाड्यांवर उत्तम कामगिरी करुन दाखवण्याची अप्रतिम क्षमता या खेळाडूमध्ये आहे. म्हणूनच रसेल सारख्या ऑल राउंडर खेळाडूची मागणीही तशीच असेल.

यापूर्वी रसेलने फलंदाजीसाठी ५२ इनिंग्ज खेळल्याअसून एकूण १४०० धावा त्याच्या नावावर जमा आहेत. गोलंदाजीसाठी त्याने एकूण ६१ इनिंग्ज केल्या असून त्याने एकूण ५२ विकेट घेतल्या आहेत.

५) एम. एस. धोनी

हो भारताचा हा माजी कप्तान देखील आयपीएलच्या अनेक संघांना हवाहवासा वाटणारा आहे. सुरुवातीच्या सीजनमध्येही धोनी सर्वाधिक बोली असणारा खेळाडू होता, आणि या सीजनमध्ये जर आयपीएलचा लिलाव झालाच तर आजही त्याचे नाव महागड्या खेळाडूंच्या यादीत नक्की असेल. मागच्या सर्व सीजनमध्ये एमएसडीने एका चांगल्या मार्गदर्शकाची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने निभावली. २ वर्षे त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली असली तरी, त्याने आपल्या संघाला तीनवेळा विजेते पद मिळवून दिले आहे. आपल्या संघातील तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्या विकेट कीपिंगची जादू दाखवून देण्यासाठी हा “कॅप्टन कूल” आपल्या संघात हवा अशी अपेक्षा असणे साहजिकच आहे. त्यामुळे या आयपीएल मध्येही धोनी जास्तीत जास्त बोली असणारा खेळाडू ठरला असता.

१७० इनिंग्ज मध्ये धोनीने यापूर्वी ४४३२ धावा केल्या आहेत. त्याच्या सरासरी धावांची संख्या ४२.२१ इतकी आहे.

आयपीएलचा पुन्हा एकदा लिलाव सुरु झाल्यास, या खेळाडूंना सर्वाधिक मागणी असू शकते. अर्थात, आपापल्या आवडत्या खेळाडूंना खेळताना पाहणे हीच क्रिकेटवेड्यांसाठी एक पर्वणी असते. पण, या खेळाच्या व्यावसायिक स्पर्धेने भारतीय अर्थव्यवस्थेत देखील चांगलीच भर घातली आहे.