भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार अणि सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज विराट कोहली ने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
आयसीसी च्या टेस्ट क्रमवारीत विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया चा फलंदाज स्टीव्ह स्मिथ ला मागे टाकत 934 गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. असा विक्रम करणारा विराट कोहली हा सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे.
आत्तापर्यंत हा विक्रम सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसकर, विरेंद्र सेहवाग, सुनिल गावसकर, गौतम गंभीर याच भारतीय खेळाडूंच्या नावावर होता.