भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू यांना भारत सरकारने राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार जाहीर केले आहे. हे पुरस्कार 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातील. याचबरोबर खेळ क्षेत्रातील अर्जुन अवॉर्ड, द्रोणाचार्य अवॉर्ड आणि ध्यानचंद अवॉर्ड हे अवॉर्डस देखील राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातील. हे अवॉर्ड मिळणाऱ्या खेळाडूंची यादी बरेच दिवस झाली सर्वांसाठी खुली होती, पण सरकारने औपचारिकरित्या काल म्हणजे 20 सप्टेंबर रोजी ती जाहीर केली.

तसेच अर्जुन अवॉर्ड मिळणाऱ्या 20 खेळाडूंपैकी एक नीरज चोपडा हा भालाफेकपटू निवडला गेला आहे. राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात येईल.

विराट कोहली हा ICC रँकिंगमध्ये सध्या क्रमांक एकचा खेळाडू आहे. कोहलीची 2016 आणि 2017 मध्ये या पुरस्कारासाठी नेमणूक करण्यात आली होती, पण त्यावेळी त्याची निवड होऊ शकली नाही. विराट कोहलीने त्याच्या 71 टेस्ट सामन्यात 6147 धावा काढल्या आहेत, त्यात 23 शतकांचा समावेश आहे. आणि एकदिवसीय 211 सामन्यात त्याचे 35 शतक आणि 9779 धावा काढल्या आहेत.

मीराबाई चानू ही या मानांकित अवॉर्डसाठी निवडली गेली आहे कारण गेल्यावर्षीच्या जागतिक प्रतियोगीतेत 48 किलोग्रॅम वजनी गटात तिने सुवर्णपदक पटकावले होते. यावर्षी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तिने भारतासाठी पिवळे पदक पटकावले होते.

इतर पुरस्कारांसाठी घोषित झालेले आणखी काही खेळाडू-

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार-

1) विराट कोहली आणि 2) मीराबाई चानू

अर्जुन पुरस्कार

1) नीरज चोप्रा, 2) जिन्सन जॉन्स, 3) हिमा दास (सर्व अ‍ॅथलेटिक्स), 4) एन. सिक्की रेड्डी (बॅडमिंटन), 5) सतीश कुमार (बॉक्सिंग), 6) स्मृती मानधना (क्रिकेट), 7) शुभंकर शर्मा (गोल्फ), 8) मनप्रीत सिंग, 9) सविता पुनिया (दोघेही हॉकी), 10) रवी राठोड (पोलो), 11) राही सरनोबत, 12) अंकुर मित्तल, 13) श्रेयशी सिंग (सर्व नेमबाजी), 14) मनिका बत्रा, 15) जी. साथीयान (दोघेही टेबल टेनिस), 16) रोहन बोपण्णा (टेनिस), 17) सुमीत (वेटलिफ्टिंग), 18) पूजा कडियान (वुशू), 19) अंकुल धामा (पॅराअ‍ॅथलेटिक्स), 20) मनोज सरकार (पॅराबॅडमिंटन)

द्रोणाचार्य पुरस्कार

1) सी ए कटप्पा (बॉक्सिंग), 2) विजय शर्मा, 3) ए श्रीनिवास राव, 4) सुखदेव सिंग पन्नू, 5) तारक सिन्हा, 6) व्ही आर बीडू , 7) जीवन कुमार शर्मा, 8) कॅलरेन्स लोबो.

ध्यानचंद अवॉर्ड –

1) सत्यदेव प्रसाद (तिरंदाजी), 2) भरत छेत्री (हॉकी), 3) बॉबी अलॉयसिस (अ‍ॅथलेटिक्स), 4) दादू चौगुले (कुस्ती)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here