सर्वात कमी इनिंग मध्ये 10,000 रन्स पूर्ण करून विराटने सचिन तेंडुलकर यांचा रेकॉर्ड मोडला आहे. विराट कोहली हे 2018 मध्ये अद्वितीय फॉर्म मध्ये दिसून येत आहेत. त्यांनी फक्त 205 इनिंग मध्ये हा रेकॉर्ड केला आहे. सचिन तेंडुलकरने हाच रेकॉर्ड 259 इनिंग मध्ये केला होता.

कोहली हा पाचवा भारतीय आणि संपूर्ण क्रिकेट जगामध्ये 13 वा प्लेयर आहे ज्याने 10,000 रन्स पूर्ण केले आहेत. विशाखापट्टणम येथे मॅच सुरू असताना कोहलीचे एकूण रन्स 9919 इतके होते, फक्त 81 रणाची आवश्यकता होती. त्याच्या 205 इनिंग मध्ये त्याने आतापर्यंत 37 शतक आणि 49 अर्धशतक मारले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 90+ आहे.

क्रिकेट इतिहासातील 13 खेळाडूपैकी पाच भारतीय आहेत आणि भारतीयांमध्ये कोहली हा पाचवा खेळाडू आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर (18246) टॉप वर आहेत, त्यांनंतर सौरव गांगुली (11363), राहुल द्रविड (10889) , महेंद्रसिंग धोनी (10123) आणि शेवटी विराट कोहली आहेत.

या वर्षीच्या टेस्ट मध्ये सर्वात जास्त रन्स काढणारा कोहली हा एक प्लेयर आहे. 2018 मधील टेस्ट मध्ये कोहलीने 1063 रन्स काढले आहेत त्यात 4 शतक आणि 4 अर्धशतक यांचा समावेश आहे.