सध्या जगभरात कसोटी क्रिकेट मध्ये विराट कोहलीचे नाव चांगले गाजत आहे. कसोटी क्रिकेट मधील हा शानदार खेळाडू सध्या आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येक सामन्यात कोहली कोणत्याना कोणत्या खेळाडूचा रोकॉर्ड तोडण्याच्या तयारीत असतो. सध्या इंग्लड दौऱ्यावर असलेल्या विराट ला सुनील गावस्कर चा रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे.

भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी सामन्यांपैकी आत्तापर्यंत झालेल्या ७ डावांमध्ये फलंदाजी करताना विराट कोहलीने १४९, ५१, २३, १७, ९७, १०३ आणि ४६ अशा एकूण ४८६ धावा काढल्या आहेत. उर्वरीत कसोटी सामन्यात विराटला हा रेकॉर्ड मोडण्याची संधी मिळताना दिसत आहे

भारताच्या कसोटी इतिहासात आत्तापार्येंत एका संपूर्ण मालिकेत सर्वात जास्त धाव काढण्याचा रेकॉर्ड भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे.

१९७०-७१ च्या सत्रात भारतीय संघ पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी वेस्ट-इंडिज च्या दौऱ्यावर गेला होता. त्या ५ कसोटी सामन्यांपैकी ४ कसोटी सामने सुनील गावस्करला खेळायला मिळाले होते. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात गावसकरने ६५ आणि नाबाद ६७ अशी कामगिरी केली होती. तिसऱ्या कसोटीत त्यांनी ११६ आणि नाबाद ६४ धावा काढल्या होत्या, तर ब्रिजटाऊनच्या चौथ्या कसोटीत त्यांनी १ आणि नाबाद ११७ धावा केल्या होत्या. त्यानंतर पोर्ट स्पेन वर खेळलेल्या पाचव्या सामन्यात त्यांनी १२४ आणि २२० अशी अप्रतिम खेळी खेळली होती. म्हणजेच त्यांनी ४ कसोटीतल्या ८ डावांमध्ये एकूण ७७४ धावा बनवल्या होत्या.

विराट कोहलीला इंग्लंड दौऱ्यात गावस्करचा हा रेकॉर्ड तोडण्यासाठी उर्वरित सामन्यात २८८ धावांची गरज आहे, जर उर्वरित दोन सामन्यात विराटने २८८ धावा केल्या तर सुनील गावस्कर नंतर हि कामगिरी करणारा विराट हा दुसरा भारतीय खेळाडू ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here