भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान ‘विराट कोहली‘ यांनी BCCI ला विनंती केली आहे की, ‘जेंव्हा भारतीय टीम विदेश दौऱ्यावर असते तेंव्हा त्या खेळाडूंवरील नियमांमध्ये BCCI ने बदल करून खेळाडूंच्या पत्नींना संपूर्ण दौरा सोबत राहण्याची परवानगी द्यावी.’ अशी मागणी केली आहे.

सध्याच्या नियमानुसार खेळाडूंच्या पत्नी फक्त 2 आठवडेच खेळाडू बरोबर विदेश दौऱ्यावर असू शकतात. हा नियम भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर राबवण्यात आला होता. परंतु कोहली भारताच्या येणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी या नियमांमध्ये बदल करू इच्छित आहेत.

पत्नींना सोबत येऊ द्यायचं की नाही हा खूप वर्षांपासूनचा चर्चेचा मुद्दा आहे. कोहलीच्या या विनंतीची दखल Committee Of Administrators(CoA) ने घेतली आहे.

तसेच भारतीय टीमचे मॅनेजर ‘सुनील सुभ्रमन्यम’ यांनी सुद्धा CoA कडे फॉर्मल रिक्वेस्ट केली आहे. परंतु यावर तातडीने निर्णय CoA घेऊ शकत नाही कारण CoA हाच निर्णय नवीन गव्हरनिंग बॉडी तयार झाल्यानंतर घेणार आहे, तोपर्यंत मात्र सर्वांना वाट पाहावी लागणार आहे.

विराट च्या या मागणीवर BCCI काय निर्णय घेणार हे आता जाणून घेण्याची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here