भारतीय माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी, एक असा खेळाडू ज्याने 199 एकदिवसीय सामने खेळले, आणि 2017 मध्ये खूप लवकरच आपल्या कर्णधार पदावरून पायउतार घेतला.

धोनीने आपल्या जागी विराट कोहलीला भारतीय क्रिकेट टीमच्या कर्णधाराचे पद सोपविले.

धोनीने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे थेट स्पष्टीकरण त्याच्याकडे असतेच, भलेही तो निर्णय मैदानावरचा असो किंवा सामान्य जगातला असो. धोनीने विराट कोहलीला तिन्ही खेळ प्रकारात कर्णधार करण्याच्या कारणाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.

बिर्सा मुंडा हवाईअड्डा, रांची येथे झालेल्या Central Industrial Security Force(CISF) च्या कार्यक्रमात 37 वर्षाच्या धोनीला आपल्या कर्णधार पदाच्या राजीनाम्याविषयी विचारले असता त्याने असे सांगितले की,

” मी एवढ्या लवकर राजीनामा का दिला तर मला वाटत होते की नवीन कर्णधाराला 2019 च्या वर्ल्डकप पूर्वी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे, कॅप्टनला पुरेसा वेळ न देता मजबूत टीम तयार करणे शक्य नाही. मला असं वाटतं की मी योग्य वेळी माझ्या कप्तान पदावरून राजीनामा दिला आहे.”

धोनीच्या कॅप्टन्सी दरम्यान भारताने 110 एकदिवसीय सामने जिंकले आहेत आणि 74 सामने हारले आहेत. आतापर्यंत फक्त तीनच कॅप्टन असे झाले आहेत की ज्यांनी 100 पेक्षा अधिक एकदिवसीय सामन्यासाठी भारताचं नेतृत्व केलं आहे, महम्मद अझुरद्दीन, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी. सामने जिकण्यात धोनीची टक्केवारी सगळ्यांपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळेच धोनी आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार झाला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 52 एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून खेळला आहे. त्याची जिकण्याची टक्केवारी सुद्धा 76.47% आहे, जी की उल्लेखनीय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here