सर्वात अगोदर सार्वजनिक वाहतुकीमध्ये CNG ऐवजी H-CNG चा वापरकरण्यास दिल्ली सज्ज झाली आहे. भारताची राजधानी ह्या H-CNG इंधनाची बसेस लाँच करणार पहिलं शहर बनतय. या तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी दिल्ली सरकारने Indian Oil Corporation Limited(IOCL) सोबत करार केला आहे.

CNG आणि H-CNG काय आहे?

CNG म्हणजे Compressed Natural Gas आणि H-CNG म्हणजे Hydrogen enriched CNG म्हणजे CNG मध्ये ठराविक प्रमाणात हायड्रोजन मिसळले असता त्याचे रूपांतर H-CNG मध्ये होते.

भारतात सर्वात अगोदर दिल्ली मध्ये 50 H-CNG बसेस लाँच होतील. यामध्ये IOCL त्या बसेसचं कार्य, त्यांच्यापासून कार्बन उत्सर्जन किती प्रमाणात कमी झाले याचा अभ्यास करणार आहे. सध्या दिल्ली मध्ये हवा प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

H-CNG चा सर्वात मोठा फायदा जर कोणता असेल तर तो ‘H-CNG मुळे वाहनातील इंजिनच्या मॉडेलमध्ये कोणताच बदल करावा लागणार नाही,’ हा आहे. नाहीतर इंधन बदललं की वाहनांच्या इंजिनमध्ये बदल करावाच लागायचा आणि त्यासाठी खूप मोठे नुकसान आणि इन्व्हेस्टमेंट सहन करावी लागायची. HCNG साठी इंजिनमध्ये काही क्षुल्लक फेरफार करावा लागणार आहे.

CNG चे H-CNG मध्ये रूपांतर करायला जे हायड्रोजन लागणार आहे ते मिथेन पासून मिळवलेलं हायड्रोजन असणार आहे. H-CNG इंधनाच्या वाहनांनी CNG पेक्षा खूप कमी प्रमाणात कार्बन उत्सर्जन केलं आहे. यामुळे हवा प्रदूषणावर आळा बसेल, यामुळे वाहनांचे मायलेज 4 – 5 % नी वाढेल. H-CNG इंधनाच्या किंमतीत CNG पेक्षा 72 पैश्यांची वाढ होईल. ही एक क्षुल्लक वाढ असून पर्यावरणाच्या नुकसानापुढे ही वाढ काहीच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here