Google आपल्या युजर्सची हँगआऊट सेवा 2020 मध्ये बंद करणार आहे. Google ने ही माहिती 9 टू 5 या गुगलच्या प्रॉडक्ट्सचा खाका तयार करणाऱ्या ब्रँच तर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली. Tech जगतातील दिगग्ज असणाऱ्या कंपनीने 2013 मध्ये आपल्या G-Chat ऐवजी हँगआऊट लाँच केले होते. परंतु चार पाच वर्षातच या दिगग्ज कंपनीच्या अँपला सुद्धा बंद करावे लागले.

कंपनीने अलीकडच्या वर्षात या अँप्लिकेशनला अपडेट करणे बंद केले होते. तसेच SMS संदेशांना हँगआऊट पासून विलग करण्यात आल्यामुळे या अँप्लिकेशन मध्ये कमतरता आली. तरी सुद्धा वेब वर जी-मेल मध्ये हँगआऊटच मुख्य चॅट ऑप्शन आहे आणि हे अँप्लिकेशन गूगलच्या प्ले स्टोअर वर सुद्धा उपलब्ध आहे.

गुगलचं हँगआऊट हे एक संपर्क प्लॅटफॉर्म आहे, ज्याला कंपनीनेच तयार केलं होतं. यामध्ये मेसेजिंग, व्हिडिओ चॅट, SMS सारखे अन्य बरेच फीचर ऍड आहेत. बऱ्याच IT क्षेत्रातल्या व्यक्तींच म्हणणं आहे की, हँगआऊट अँप्लिकेशन खूप जून आहे आणि यात आता मोठ्या प्रमाणात बग्ज दिसत आहेत. त्याचबरोबर हँगआऊट च्या प्रदर्शनाचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. प्रदर्शन व्यवस्थित नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात याची लोकप्रियता कमी होत आहे.

हँगआऊट जरी Google सारख्या दिगग्ज कंपन्यांनी बनवलं असलं तरी लोकांनी त्याला संपूर्णतः स्वीकारले नाही. त्यामुळेच तर हँगआऊटला पाच वर्षांच्या आतच बंद करावं लागत आहे. हँगआऊट अन्य मेसेजिंग ऍप्स प्रमाणे आकर्षक नाही. त्यामुळे लोकांचे आकर्षण याकडे कमी झाले, परिणामी याला आता बंद करावं लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here