भारतात मागच्या काही वर्षात लोकांचा स्मार्टफोन खरेदीवर मोठा भर दिसत आहे. कारण मागच्या दोन तीन वर्षात स्मार्टफोन युजर्सची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. याच एक महत्वाच कारण हे आहे की भारतीयांची खरेदी करण्याची क्षमता मागच्या काही वर्षात उल्लेखनीय वाढली आहे. स्मार्टफोन युजर्सची संख्या वाढण्याच दुसरं एक कारण म्हणजे भारतात स्वस्त आणि लोकांना परवडणाऱ्या रेंजमध्ये मोबाईल फोन्स विकले जातात, त्यामुळे सुद्धा स्मार्टफोन विक्रीत खूप वाढ झाली आहे. भारतात फक्त 5 हजार रुपयात सुद्धा तुम्ही 4G स्मार्टफोन विकत घेऊ शकता. भारतात पर्याय खूप सारे आहेत, त्यामुळे भारतीय बाजारात लोकांना ज्या रेंज मध्ये पाहिजे त्या रेंज मध्ये स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

रिसर्च फर्म ‘काऊंटरपॉईंट’ या खाजगी संस्थेच्या रिपोर्टनुसार 2022 पर्यंत भारतात स्मार्टफोन युजर्स ची संख्या ही 70 कोटी एवढी असेल आणि 100 कोटी पर्यंत स्मार्टफोनची विक्री होईल. स्मार्टफोन च्या वाढत्या विक्री मागे रिलायन्स जिओ आणि अन्य दूरसंचार कंपन्या यांच्यातील प्राईस वॉर हे एक मुख्य कारण आहे. युजर्स ना फ्री कॉल आणि डेटा मिळत असल्या कारणाने मल्टिमीडिया फीचर फोन ऐवजी स्मार्टफोन खरेदीकडे लोकांचा कल दिसत आहे. 2018 मध्ये मिड रेंज स्मार्टफोनची खरेदी सर्वात जास्त झाली होती. 14 हजार ते 20 हजार पर्यंतच्या स्मार्टफोनला मिड रेंज स्मार्टफोन असे म्हणतात. येत्या दोन तीन वर्षात या मिड रेंज स्मार्टफोनची विक्री चार ते पाच पटीने जास्त वाढणार आहे, असा अंदाज आहे.

या एफोदार भारतात 10 हजार पेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनची विक्री ही सर्वात जास्त व्हायची. परंतु आता मात्र मिड रेंज स्मार्टफोन जास्त विकले जात आहेत. हे स्मार्टफोन्स फ्लॅगशिप मॉडेल फीचर्स आणि पूर्ण क्षमतेनिशी असणार आहेत. तरुण पाठक जे काउंटरपॉइंट चे निर्देशक आहेत त्यांनी म्हटले की, ” फुल स्क्रिन, ड्युल कॅमेरा, बायोमेट्रिक सेक्युरिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणाऱ्या या फोन्स मुळे लोकांचा कल यांच्या खरेदीसाठी जास्त आहे. आणि जागतिक मोबाईल कंपन्या सुद्धा मिड रेंज स्मार्टफोन निर्मितीवर जास्त भर देतील. कारण भारतीय बाजारात मिड रेंज स्मार्टफोन्सची मागणी या काळात वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here