जवळपास सर्वच्या सर्व अँड्रॉइड मोबाईल अँप्स हे युजर्सचा डेटा गूगल बरोबर शेअर करत असल्याची धक्कादायक बातमी, ऑक्सफोर्डच्या संशोधकांनी बाहेर काढली आहे. संशोधकांनी एकूण 9,59,000 अँप्सचं म्हणजे साडे नऊ लाखांपेक्षा जास्त अँप्लिकेशनची पडताळणी केली आहे आणि त्यात त्यांना थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन ट्रॅकर्सचा हात असल्याचं आढळून आलं. ही माहिती कंपनीला आपली प्रोफाइल बनवण्याकरीता आणि युजर्सना ऍड वरून टारगेट करण्यास मदत करते.

ट्रॅकर्स चा पडदा फाश करण्यासाठी संशोधकांनी US आणि UK च्या Google Play Store वरील कोड ऑफ अँप्सची पडताळणी केली. त्यांना या पडताळणीत आढळून आलं की 88% पडताळणीतील अँप्स हे Google च्या पॅरेण्ट कंपनी अल्फाबेट सोबत शेअर केला जात आहे आणि 43%- 34% अँप्स हे डायरेक्ट google सोबत शेअर करत होती. त्यात ऍमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यांनी सुद्धा 18% आणि 23% पडताळणीतील अँप्स पासून डेटा चोरी शेअर केला होता.

जे अँप्लिकेशन न्युजसाठी आणि लहान मुलांसाठी आहेत त्यांच्याकडून मोठा हिस्सा शेअर केला जातोय. संशोधकांच्या म्हणण्यानुसार यामुळे लहान मुलांचे डिजिटल प्रोफाईलिंग त्यांच्या पालकांच्या परवानगीशिवाय करण्याचे प्रमाण वाढेल आणि असे करणे बेकायदेशीर आहे.

या डेटा शेअरिंग मध्ये तुमचे वय, लिंग, तुमचे google वरील सर्च, लोकेशन, तुम्ही कोणतं डिव्हाईस वापरता, तसेच तुमचं शॉपिंग हॅबिट आणि तुमचे राजकीय मत सुद्धा शेअर केले जाते. ही माहिती युजर्सना त्यांच्या सोयीच्या ऍड पाठवण्यास आणि त्यांना योग्य ते राजकीय मेसेजस पाठवणे सोपे जाईल आणि त्यामुळे गुगलचाच फायदा होणार.

Google ने संशोधकांनी वापरलेली पद्धत ही चुकीची असल्याचं म्हणत त्यांनी या संशोधनाला स्वीकारल नाही. Google ने म्हटले की, “आमचे धोरण स्पष्ट आहे आणि डेव्हलपर्स आणि डेटा हाताळणीचे मार्गदर्शन सुद्धा क्लिअर आहे. आम्हाला डेव्हलपर्स सुद्धा पारदर्शक पाहिजेत आणि कोणताही डेटा शेअर करण्याअगोदर आम्ही यूजर्सची परमिशन घेतो. जर कोणते अँप्लिकेशन आमच्या धोरणाचे उल्लंघन करत असेल तर आम्ही ताबडतोब त्यांच्यावर ऍक्शन घेतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here