Apple कंपनीच्या सर्व गॅजेट्ससाठी डोळ्यात तेल ओतून बरेच जण 12 सप्टेंबर या तारखेची वाट बघत असतात. Apple कंपनीचे सर्व प्रॉडक्ट्स याच दिवशी जगभरासमोर आणले जातात.

Apple ने या वर्षी आपले कोणकोणते iPhone लाँच केले आहेत, कोणकोणते नवीन डिव्हाईस लाँच केले आहेत ते आपण येथे पाहूया.

 Apple Watch Series 4 –

Apple ने आपले हे घड्याळ संपूर्णपणे नवीन डिझाईनने लाँच केले आहे. या घड्याळाचे लूक लोकांना मोहून टाकणारे आहे. ह्या घड्याळाच्या स्क्रीनने संपूर्ण घड्याळंच व्यापले आहे, त्यामुळे हे घडयाळ लहान आणि एकदम स्लिम बनलं आहे. त्यामुळे त्याचं लूक लोकांसाठी आकर्षक ठरत आहे. या स्क्रीनमुळे जेवढी काही माहिती घड्याळात येते त्यासाठी खूप मदत झाली आहे, त्यामुळे आता ग्राहकांना जास्त फीचर्सचं घड्याळ वापरायला मिळणार आहे. Apple चे Jeff William यांनी म्हटलं आहे की, हे घड्याळ ‘intelligent guardian’ बनलं आहे.

 

या घड्याळाच्या GPS version ची किंमत 399 डॉलर असून cellular version ची किंमत 499 डॉलर आहे. 21 सप्टेंबर पासून ही घड्याळं बाजारात येतील. Series 3 चे घड्याळ 279 डॉलर या किमतीत बाजारात येईल.

 नवीन iPhone लाँच

यावर्षी Apple ने फक्त एकच iPhone version X लाँच केलं नसून तीन तीन फोन लाँच केले आहेत. पहिल्यांदा Tim Cook यांनी हा नवीन iPhone लाँच केला आणि ते सांगू इच्छित होते की, iPhone X हा जगातील सर्वात लोकप्रिय फोन बनला आहे. त्यात i) iPhone XS, ii) iPhone XS max आणि शेवटचा iii) iPhone XR यांचा समावेश आहे.

या iPhone मध्ये कदाचित आतापर्यंतचा सर्वात मोठा display आहे, आणि तुलनात्मक दृष्ट्या यांची किंमत सुद्धा जास्त नाही. या iPhone चा चमकदार सोनेरी कलर मधील फोनचा लूक लाँच च्या अगोदरच लीक झाला होता.

Apple चे Phil Schiller या इव्हेंट मध्ये बोलताना स्टेज वर येऊन सांगतात की, आता Apple ने dual-lens कॅमेरा मध्ये खूप अतुलनीय बदल घडवून आणला आहे. आतापर्यंतच्या iPhone पेक्षा सर्वात जास्त बॅटरी क्षमता असलेले हे iPhone X फोन आहेत. आतापर्यंत सर्वांना वाटत असलेली शंका म्हणजे iPhone dual-sim का नाही तर हि शंका दूर करत आता हे फोन dual-sim केले गेले आहेत.

तुम्हाला तुमच्या बास्केट बॉल या गेम मधील AR tech पध्दती तुम्हाला फीडबॅक देऊन मदत करेल, आणि Home Court App तुम्हाला खऱ्या वेळेची insight सुद्धा देत.

या कार्यक्रमात Apple ने सांगीतले की त्यांनी काही game developers ना सुद्धा सामावून घेतलं आहे. त्यामुळे याआधी न मिळालेलं फील आता तुम्हाला मिळणार आहे. अगोदरच्या iPhone पेक्षा नवीन environment यात घेतलं गेलं आहे. Elder Scrolls हा गेम iPhone XS वर अप्रतिम दिसतो त्यामुळे XS वर हा गेम खेळण्याची मजाच वेगळी आहे.

असे आहेत Apple ने लौंच केलेले नवीन डिवाईस. यासारख्याच आणखी अपडेटसाठी आमच्या Whatsapp ला जॉईन करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here