ऍप्पल आणि गूगल सारख्या टेक कंपन्या आपल्या ऍप्प स्टोअर वर विकतायत जासुसी करणारे अँप्लिकेशन्स. ज्यांचा वापर करून दुसऱ्यांच्या फोनवर आपण लक्ष ठेवू शकतो, त्यांचे मेसेज पाहू शकतो, मुलांच्या फोनवर लक्ष ठेवू शकतो, कंपनीतील कर्मचाऱ्यांना ट्रॅक करू शकतो. या अँप्लिकेशन चा वापर करून तुमचा पार्टनर तुमची जासुसी करू शकतो.

या अँप्लिकेशनचा वापर करून आपण दुसऱ्याच्या फोन वर आलेले कॉल रेकॉर्ड करू शकतो. त्या फोनची GPS लोकेशन ट्रॅक करू शकतो, एवढंच नाही तर त्या फोन वरील सोशल मीडिया ऍप्प वर सुद्धा लक्ष ठेवता येत, त्यावरील मेसेज पाहता येतात. तसेच त्या फोन वर केलेल्या इंटरनेट ब्राऊझिंग ची हिस्ट्री सुद्धा मिळवता येते.

अशाच प्रकारच्या एका अँप्लिकेशनच नाव आहे ‘एमस्पाई’. हे अँप्लिकेशन ऍप्पलचं प्रमुख पॅरेंटल अँप आहे. याच्या वापरासाठी एकूण 149.9 पौंड प्रतिवर्षी खर्च करावे लागतात. म्हणजे एक वर्ष हे अँप्लिकेशन वापरण्यासाठी 13, 500 रुपये खर्च करावे लागतील. हे अँप्लिकेशन मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.

हे अँप्लिकेशन युजर्सला टेक्स्ट मेसेज, कॉल, व्हाट्सअप्प, GPS लोकेशन, स्नॅपचॅट यांची माहिती पुरवतं. हे अँप्लिकेशन वापरण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यात तुम्ही ज्या व्यक्तींची जासुसी करू इच्छिता त्यावर तुमचं स्वामित्व असणे बंधनकारक आहे. जर फोन कोणत्या तिसऱ्या व्यक्तीचं असेल तर तुम्हाला आधी त्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागेल. या अँप्लिकेशनचं मुख्य फिचर हे आहे की या ऍप्पचं आयकॉन फोनच्या होम स्क्रीन वर हिडन असेल.

आशा अँप्लिकेशन्सचा वापर करून तुम्ही तुमच्या स्वकीयांवर लक्ष ठेवू शकतो. आणि त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून सावध करू शकतो. त्यामुळे त्यांना तुम्ही गंभीर गोष्टींपासून वाचवू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here