अखेर Apple ने लाँच केले नवीन अपडेटेड Macbook Air लॅपटॉप. Macbook हा सर्वात लोकप्रिय लॅपटॉप आहे, अनेक दिवसांपासून लोक यांच्या नवीन अपडेटेड व्हर्जन साठी वाट पाहत होते. या नवी Macbook Air चे फीचर्स लॅपटॉप मध्ये रेटिना डिस्प्ले आणि टच ID फिंगरप्रिंट सेन्सर बसवण्यात आलं आहे.

या नवीन कमी किंमतीच्या नोटबुक मध्ये Apple Macbook Pro 2016 च्या लॅपटॉप मधील सर्व टेक्नॉलॉजी इन्स्टॉल केलेल्या आहेत. यामध्ये नवीन Force Touch Trackpad, नवीन keyboard आणि पॉवर आणि काँनेक्टिव्हिटी साठी Two Thounderbolt 3 ports त्यात इन्स्टॉल केले आहेत.

Macbook Air चे फीचर्स –

● Macbook Air मध्ये 13.3 इंच रेटिना डिस्प्ले आहे.

● Thinner bezels आणि नवीन स्टिरीओ स्पीकर बसवण्यात आले आहेत आणि ते जुन्या स्पीकर पेक्षा 25% मोठ्या     प्रमाणात आवाज करतात.

● यामध्ये Apple चे Touch ID Print Scanner बसवले आहे.

● थर्ड पार्टी अँप्स वापरण्यासाठी आणि मशीन मध्ये सुरक्षित लॉग इन करण्यासाठी यामध्ये T2 सेक्युरिटी चिप ही बसवण्यात आली आहे.

● या लॅपटॉप मध्ये dual-core i5, 3.6 GHz processor आहे.

● तसेच यामध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे.

● अमेरिकेत याची किंमत 1199 USD एवढी आहे, जुन्या macbook pro आणि 12 इंचाच्या macbook पेक्षा किंमत कमी आहे.

● याची जाडी 15.6 mm आहे आणि 17% कमी आकारमान आहे. तसेच याचे वजन 1.25 kg एवढे आहे, जुन्या व्हर्जन पेक्षा 100 gm कमी वजन आहे.

Apple म्हणतंय हा नवीन लॅपटॉप हा 100% रिसायकल केलेल्या अल्युमिनियम पासून तयार करण्यात आलेला आहे. नवीन लॅपटॉप जुन्या लॅपटॉप पेक्षा 10% पातळ आहे. लॅपटॉपची जाडी आणि आकारमान हे जुन्या लॅपटॉप पेक्षा कमी आहे. तसेच याचे वजन सुद्धा जुन्यापेक्षा 100 gm कमी आहे. याची बॅटरी लाईफ 12 तास आहे. Intel च्या 5th generation चा वापर करून 2015 मध्ये शेवटी या macbook ला अपडेट केले होते. त्यानंतर पहिल्यांदाच 2018 मध्ये अपडेट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here