चीनचे भारतातील कौन्सिल जनरल Ma Zhanwu याने 12 सप्टेंबर 2018 रोजी भारतासमोर एक प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव ‘भारत आणि चीन दरम्यान एक बुलेट ट्रेन मार्ग प्रस्थापित करण्याचा आहे’. भारतातील कोलकाता ते चीनमधील कुनमिंग शहर बुलेट ट्रेन ने जोडण्यासाठी हा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला. परंतु या प्रस्तावात स्पष्टतेचा अभाव आहे, यात हा मार्ग नेमकं कोणत्या मार्गे असेल, या प्रोजेक्टसाठी लागणारे फंड कोणकोणत्या देशाने किती किती द्यायचे की फक्त भारत आणि चीनच फंडिंग करायच, हे पण स्पष्ट नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे हे प्रोजेक्ट चीनच्या बेल्ट आणि रोड इनिशिअटीव्ही(BRI) चा भाग आहे की नाही हे चीनकडून स्पष्ट केलं गेलं नाही. भारताचा चीनच्या BRI ला विरोध आहे, त्यामुळे हे प्रोजेक्ट त्याचा भाग असेल तर भारत नक्कीच माघार घेईल.

चीनच्या कुनमिंग आणि भारताच्या कोलकाता शहराला जोडण्यासाठी याअगोदर पण चीनकडून प्रस्ताव आला आहे, परंतु तो बुलेट ट्रेन साठीचा नव्हता. बुलेट ट्रेनने हा मार्ग जोडण्याचा हा पहिलाच प्रस्ताव आहे. जवळपास 2800 किमी अंतर बुलेट ट्रेनने जोडले जाईल. “हा मार्ग तयार झाल्यानंतर कुनमिंग ते कोलकाता प्रवास हा अवघ्या काही तासाचा असेल.” असे Ma Zhanwu म्हणाले. या अगोदर 1999 मध्ये BCIM Economic Corridor बनवण्याचा मानस चीनचा होता. BCIM म्हणजे बांगलादेश-चीन-भारत-म्यानमार कॉरिडॉर. पण त्याकाळात उभय देशातील तणावाची स्थिती आणि भारताची चिंता यामुळे हा प्रस्ताव थंडया बस्त्यात गेला होता. त्यावेळी याला Kunming Initiative असही म्हटलं जातं होतं.

जर या प्रोजेक्ट बद्दल दोन्ही सरकारात एकमत बनलं तर या बुलेट ट्रेन मुळे अनेक फायदे उभय देशांना होणार आहेत.

बुलेट ट्रेन मुळे होणारे फायदे –

  • भारताच्या पूर्वोत्तर राज्यांत विकासाला आणखी गती येईल आणि त्या राज्यातील आर्थिक क्षमतांना वाव मिळेल.
  • यामुळे भारत-चीन यांच्या दरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी आणखी मदत होईल.
  • पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होईल.
  • फक्त याच भागात या प्रोजेक्टचा फायदा होणार नाही तर भारताच्या Act East धोरणाला सुद्धा याचा खूप फायदा होईल.
  • चीनला मलाक्का खाडी व्यतिरिक्त दुसरा एक मार्ग मिळेल.
  • कोलकाता येथील बंदराचे महत्व आणखी वाढेल.

भारताला या प्रोजेक्ट पासून काही हानी आहे का? चीनचे काही दुष्ट हेतू तर नाहीत ना? भारत सरकार चीनचा हा प्रस्ताव स्वीकारेल की नाही, नाही तर का नाही? या बद्दलची माहिती आपण येत्या काळात पाहणारच आहोत.

अशाच आणखीन माहितीसाठी www.hebaghbhau.com Subscribe ला करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here