मुकेश अंबानी यांनी 5 सप्टेंबर 2016 रोजी जिओ नेटवर्क लाँच केले होते. या नेटवर्क फ्री 4G डेटा, फ्री कॉलिंग, फ्री SMS आणि फ्री रोमिंग देऊन टेलिकॉम सेक्टर मध्ये खूप बदल घडवून आणले होते. त्यानंतर आता 4G च्या पुढील पाऊलाची तयारी सुरू आहे. 5G तंत्रज्ञानाचा वापर करून आपण काय काय करू शकतो यासाठी इंडियन मोबाईल काँग्रेस इव्हेंट भरवल होतं.

या इव्हेंट मध्ये जिओ आणि एरिक्सन यांनी मिळून 5G तंत्रज्ञानाचा वापर कशा रितीने करता येतो या बद्दलचा डेमो दिला. मुकेश अंबानी यांनी दिल्लीत बसून मुंबईतील कॉर्पोरेट पार्क मधील कार चालवून दाखवली होती. मुंबई आणि दिल्लीतील अंतर हे 1388 किलोमीटर एवढे आहे, एवढ्या दूर अंतरावर असून सुद्धा 5G टेक्नॉलॉजीचा वापर करून ती कार त्यानी चालवून दाखवली. या बरोबरच फेस रेकॉग्निशन फीचर असलेला ड्रोन सुद्धा त्यांनी ऑपरेट करून दाखवला. या इव्हेंट मधील सर्व उपस्थित लोक हा कारनामा बघून आश्चर्यचकित झाले.

मुकेश अंबानी म्हणतात की, 5G नेटवर्क हा 4G नेटवर्क पेक्षा खूप स्ट्रॉंग आहे आणि 4G च्या तुलनेत 5G नेटवर्क 10 पट जास्त पावरफुल आहे. या नेटवर्क वर कोणतेही काम आपण सहज करू शकतो. मुकेश अंबानी च्या मते या नेटवर्कमुळे आपण आपली सेल्फ ड्राइविंग कार आपण रिमोट कन्ट्रोलने कुठेही बसून ऑपरेट करू शकतो. 5G नेटवर्क मुळे सेल्फ ड्राइविंग कारला सेफ्टी ही मिळेल. तसेच डेटा नेटवर्क वर चालणारी मशिन्स आपण दूर कोठेही बसून 360 डिग्री पर्यंत ऑपरेट करू शकतो.

या इव्हेंट मध्ये रिलायन्स ने 5G स्पीडचा व्हर्चुअल रिऍलिटी डेमोही दिला. यासाठी जिओ टीमच्या वाहन चालकाने VR क्वालिटीचा चष्मा घालून ड्राइविंग करून दाखवली. यावेळी ड्रायव्हर पुर्णतः कार मध्ये असलेल्या व्हिडीओ कमेऱ्यावर अवलंबून होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here