e-SIM कार्ड्स घेत आहेत आता SIM कार्ड्स ची जागा. सिमकार्ड म्हणजे Subscriber Identity Module(SIM). Samsung, Apple यासारख्या कंपन्यानी यांचा वापर करायला सुरुवात केली आहे. येत्या काळात दूरसंचार उद्योगात क्रांतिकारक बदल घडवून आणण्याची शक्ती या e-SIM कार्ड्स मध्ये आहे.

आतापर्यंत ज्याकाही त्रुटी सर्वसाधारण SIM मध्ये होत्या त्या सर्व त्रुटी e-SIM कार्ड्स मुळे नाहीशा होत आहेत. e-SIM कार्ड्स हे पुढील तंत्रज्ञानाच पुढचं पाऊल आहेत. यांनाच embedded Universal Circuit Card (eUICC) असेही म्हणतात.

 • इ.स. 1991 – Full Size सिम कार्ड
 • इ.स. 1996 – Mini size सिम कार्ड
 • इ.स. 2003 – Micro size सिम कार्ड
 • इ.स. 2012 – Nano size सिम कार्ड
 • इ.स. 2016 – e-SIM कार्ड.

असा हा तब्बल 25 वर्षाचा प्रवास करून आज सिम कार्ड्स या प्रगतीपथावर आहेत.

e-SIM कार्ड्स चे फायदे आणि ते कसे काम करणार –

e-SIM कार्ड्सना सर्वसाधारण सिम कार्ड प्रमाणे बाहेरून मोबाईल मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये बसवायची काही गरज नाही. त्यांना वेगळ्या अशा जागेची आवश्यकता नाही.

 • e-SIM कार्ड्स हे मोबाईल मध्ये जे सिलिकॉन चिप असतं त्यातच इनबिल्ट असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला सिम स्लॉट विरहित मोबाईल फोन पाहायला मिळतील. यांची लांबी 6 mm आणि रुंदी 5 mm इतकी लहान आहे.
 • e-SIM कार्ड्स आता तुम्ही कधीही कोणत्याही नेटवर्क कंपनीच्या सवलतींचा फायदा घेऊ शकता. म्हणजे आता तुम्हाला एका कंपनीतून आपले सिम कार्ड दुसऱ्या कंपनीत पोर्ट करायचे असल्यास ते फक्त एका क्लीक वर तुमच्याच फोनवरून होणार आहे. त्यामुळे आता एकाच वेळी अनेक कंपन्यांचा तुम्ही फायदा घेऊ शकता.
 • मोबाईल फोन मधील सिम स्लॉटची जागा आता मोबाईल कंपन्यांना नवीन फीचर्स मिळवण्याकरिता वापरता येणार असून आणखी आधुनिक सुधारित मोबाईल फोन बाजारात येत आहेत. सिम स्लॉट नसल्यामुळे आता मोबाईल फोनची वॉटर प्रूफ क्वालिटी सुद्धा वाढत आहे.
 • e-SIM कार्ड्स तुमच्या फोन मध्येच इनबिल्ट असल्यामुळे फोन घेतल्यानंतर तुम्हाला इंटरनेट वापरून आपले सिमकार्ड चालू करण्यासाठी registration करावं लागणार आहे, अगदी जसं तुम्ही मोबाईल घेतल्यानंतर आपलं गूगल अकाउंट रेजीस्टर करता तसं.
 • e-SIM कार्ड्स आल्यानंतर आणखी एकदा दूरसंचार कंपन्यांच्या मार्केटिंग आणि विक्री मध्ये उथलपूथल माजणार आहे. आंतरराष्ट्रीय रोमिंग चार्जेस यामुळे जवळपास नाहीसे होणार आहेत.
 • e-SIM कार्ड्स मुळे ग्राहकांकडे आता जास्त पर्याय शिल्लक राहत आहेत. आणि ग्राहकांची सोय तर होतेच आहे पण त्यांचा वेळ पण खूप वाचणार आहे. कारण सर्वसाधारण सिमकार्डच्या वापरासाठी बऱयाच डोकेदुखीच्या कामांना लोकांना सामोरे जावे लागत होते.
 • e-SIM कार्ड्सचा वापर करून तुम्ही तुमच्या हातातल्या घड्याळाद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. e-SIM तुम्ही मोबाईल फोन व्यतिरिक्त तुमच्या घड्याळात, कार मध्ये, लॅपटॉप मध्ये , टॅबलेट मध्ये, तुमच्या कार मध्ये अशा अनेक ठिकाणी करू शकता, त्यामुळे तुम्ही याचा जास्त क्षमतेने वापर करू शकता.

Samsung ने सर्वात पहिल्यांदा e-SIM कार्ड्सचा वापर त्यांच्या स्मार्ट घड्याळात केला होता. त्यानंतर आता Apple सुद्धा आपल्या डिव्हाईस मध्ये e-SIM चा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

येत्या 1 ते 2 वर्षात तुम्हाला सगळीकडे e-SIM कार्ड्सच दिसतीलच. e-SIM कार्ड्सची एकच त्रुटी आहे जी काहींसाठी आनंदाची बाब पण आहे, कारण e-SIM कार्ड वापरायचे असल्यास तुम्हाला तुमचा सध्याचा आवडता फोन येणाऱ्या काळात बदलावा लागणार आहे. तुमच्या जुन्या फोन मध्ये e-sim चालणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here