फेसबुकने स्वतःची डेटिंग सेवा आता सुरु केली आहे, मार्केट मध्ये अगोदरच असलेल्या डेटिंग साईटला आणि एप्पना टक्कर देण्यासाठी हि सेवा सुरु केली आहे. हि सेवा आंतराष्ट्रीय पातळीवर सुरु करण्याअगोदर याची चाचणी काल कोलोम्बियात करण्यात अली आहे. हा नवीन फेसबुक डेटिंग ऍप्प अल्गोरिदम वर आधारित असेल जो एक तुमच्या स्क्रीन वर ऑपशन असेल, जो तुम्हाला विस्तृत फेसबुक च्या जाळ्यातून तुमची रोमँटिक जोडी शोधण्यास मदत करेल.

मे महिण्यात फेसबुक मध्ये पार पडलेल्या आपल्या वार्षिक F8 सॉफ्टवेयर डेवेलपर कॉन्फ्रेंस मध्ये मार्क झुकरबर्गनी डेटिंग मार्केट मध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. या इव्हेंटमध्ये सांगण्यात आले होते कि हि डेटिंग सेवा फेसबुक शी संलग्न असेल, परंतु तुम्हला असे वाटेल कि तुमचे फेसबुक अकाउंट असेल तर तुमच हे अकाउंट डेटिंग अकाऊंट बदलेल, पण असे नाही तुम्हला वेगळे फेसबुक डेटिंग अकाउंट बनवावे लागेल जे तुमच्या पर्सनल प्रोफाइल पेक्षा वेगळे असेल. आता या सेवेची चाचणी करण्यासाठी प्रथम हि सेवा कोलोम्बिओ मध्ये सुरु करण्यात अली आहे, जर याची चाचणी यशस्वी ठरली तर नंतर हि सेवा संपूर्ण देशात चालू करण्यात येईल.

फेसबुक डेटिंग एप्प चे काही वैशिष्ठे-

फेसबुक डेटिंग फिचर वापरकर्त्याचे वय हे १८ वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे, आणि हे फिचर फक्त मोबाइसाठी मर्यादित असेल.

  • जर तुम्हाला वाटत असेल कि डेटिंग प्रोफाइल बनवल्यानंतर तुमच्या फेसबुक वर असलेले मित्र किंवा नातेवाईकांना या बाबत माहिती होईल पण असे होणार नाही, कारण फेसबुक डेटिंग प्रोफाईल हि तुमच्या फेसबुक न्यूज फीड पेक्षा संपूर्ण वेगळी असेल. त्यामुळे यायबाबतची चिंता तुम्हाला सतवणार नाही.
  • तुमच्या प्रोफाइलच्या बाबतीत सांगायचे झाले  तरं त्यासाठी आवश्यक फक्त तुमचे नाव आणि वय एवढंच आहे. त्यानंतर तुंम्ही स्वतः निवडू शकता कि तुम्हला तुमच्या बाबतीत आणखीन काय ऍड करायचे आहे जसे कि तुमची उंची, धर्म, जॉब, तुमची आवड ई. तुम्ही ऍड करू शकता. त्याचबरोबर IOS मध्ये ९ व Android मध्ये १२ फोटो अथवा डेटिंग वरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता जेणेकरून तुमचे कॉन्वेरसेशन चालू करण्यास मदत होईल.  प्रोफाईल जुळवण्यासाठी १०० किलोमीटर पर्येन्तचे अंतर तुम्ही सेट करू शकता. त्याचबरोबर डिस्टन्स, एज, हाईट, रिलिजन यासाठी तुम्ही फिल्टर हि वापरू शकता.
  • प्रोफाइल बनवल्यानंतर तुम्ही फेसबुक डेटिंग अल्गोरिदम चा वापर करू शकता, हा अल्गोरिदम तुम्हाला तुमची रोमँटिक जोडी शोधण्यास मदत करेल. याचा अर्थ असा कि अन्य डेटिंग एप्प प्रमाणे तुम्हाला स्वाईप करण्याची गरज नाही. यामध्ये फेसबुक तुम्हाला तुमच्या जोडी साठी काही सजेशन देईल त्याप्रमाणे तुम्ही तुमची जोडी निवडू शकता. तुम्हला एखादी प्रोफाईल आवडली असल्यास तुम्हाला “Interested” ऑपशन वर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमचे संभाषण सुरु करण्यासाठी काही मेसेज पाठवले जातील. त्यानंतर समोरील व्यक्ती तुमचे मेसेज वाचेल आणि इंटरेस्टेड एरिया मध्ये रिप्लाय देईल. जर त्यांनी रिप्लाय केला तर तुमचे संभाषण होईल. तुम्ही तुमचे पर्सनल आणि डेटिंग मेसेजस वेगळे पाहू शकता.
  • तुम्हाला डेटिंग एप्प मध्ये व्यक्तीचे खरे वय आणि ठिकाण माहिती होईल तुम्हाला फ्रॉड करता येणार नाही.
  • फेसबुक डेटिंग वर तुम्हाला तुमच्या इंटरेस्ट नुसार तुमची जोडी मिळेल. जेंव्हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमची जोडी शोधाल तेंव्हा तुमचे जास्तीजास्त मॅच हे तुमच्या प्रेफरन्स नुसार असतील.
  • या मध्ये तुम्ही तुमचे प्रोफाइल प्रायव्हसी देखील करू शकता जेणेकरून तुम्हला हवे असेल तेच व्यक्ती तुमची प्रोफाइल पाहू शकतील. या मध्ये आणखी एक फिचर असे आहे कि तुम्ही एखाद्या व्यक्ती ला फेसबुक वर ब्लॉक केले असेल तर ती व्यक्ती तुमचे प्रोफाइल पाहू शकणार नाही.

असे काही नवीन फीचर्स घेऊन लवकरच येणार आहे फेसबुक डेटिंग एप्प.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here