facebook new features

व्हॉट्सअप ने गेल्या वर्षी ऍड केलेलं नवीन फीचर ज्यामुळे आपण मित्रांना पाठवलेले मेसेज delete ही करू शकतो, अगदी तशाच प्रकारचं फीचर आता फेसबुक मध्येही येत असल्याचे सांगितले गेले आहे. फेसबुक मेसेंजर युजर्स आता आपल्या मित्रांना पाठवलेले मेसेज delete करू शकणार आहेत. फेसबुकने स्वतः ही औपचारिक माहिती सर्वांना सांगितली. सर्वप्रथम हा फीचर्स iOS च्या 191.0 व्हर्जन मध्ये येणार आहे. तुम्हाला त्यासाठी टाइम लिमिट असेल, म्हणजे मेसेज पाठवलेल्यानंतर तुम्हाला दिलेल्या टाईम लिमिट मध्ये मेसेज delete करावा लागणार आहे. हे टाईम लिमिट 10 मिनिटं असेल. म्हणजे मेसेज पाठवल्यानंतर 10 मिनिटांच्या आतच मेसेज delete करावा लागेल.

https://twitter.com/MattNavarra/status/1060101306180878336/photo/1

व्हॉट्सअप मध्ये हा फीचर्स आल्यानंतर लोकांना सर्व सोशल मीडिया अँप वर असे फीचर पाहिजे होते. त्यात फेसबुक ही होते. फेसबुकवर असं फीचर राहावे यासाठी फेसबुक युजर्सनी फेसबुक कडे अशी मागणी केली होती. फेसबुक कडे वारंवार अशी मागणी गेल्यानंतर 2018 च्या एप्रिल मध्ये फेसबुक यावर विचार केला आणि या विषयाला गंभीरपणे हाताळत, यावर काम करण्यास सुरुवात केली.

तब्बल 6 ते 7 महिने काम केल्यानंतर फेसबुकने अखेर हे फीचर येत असल्याची माहिती सर्व युजर्सना दिली. ट्विटर वर फेसबुक च्या एका अधिकाऱ्याने ट्विट करत सर्वांना या गोष्टीची माहिती दिली. तसेच हे फीचर सर्वप्रथम iOS अँप मध्ये येणार असून त्याच्या 191.0 या व्हर्जन मध्ये ते इन्स्टॉल केले जाईल. यासाठी एखाद्या युजरला जर मेसेज delete करायचं असेल तर पाठवल्यानंतर 10 मिनिटांच्या त्याला तो मेसेज delete करावा लागेल. जर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळानंतर तुम्ही तुमचा पाठवलेला मेसेज delete केलात तर तो मेसेज delete होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here