फेसबुकने शुक्रवारी पत्रकारांना माहिती देताना म्हटले की फेसबुकच्या नेटवर्कवर सायबर हल्ला झाला आहे, या हल्ल्यामुळे अंदाजे ५ करोड फेसबुक वापरकर्त्यांच्या वयक्तिक माहिती ही प्रभावित होण्याचा धोका आहे. हल्लेखोरांनी फेसबुकच्या कायद्याचा वापर करून हा हल्ला घडवून आणला आहे. या कायद्यात फेसबुकच्या वापरकर्त्यांचं अकाउंट त्यांच्या माहितीशिवाय उघडलं जाऊ शकतं.

फेसबुकने आपल्या सेक्युरिटी अधिकाऱ्याला सक्त निर्देश दिले असल्याचे स्पष्ट केले. “आम्ही ही घटना खूपच संवेदनशीलरीत्या हाताळत आहोत आणि आमच्याकडून अतिशय मजबूत आशा सुरक्षा प्रणालीवर काम होत आहे ज्यामुळे  फेसबुकला आणखी सुरक्षित आणि स्वतंत्र बनवायला मदत होईल” असं फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले.

“जरी हा संवेदनशील हल्ला असला तरी आम्हाला आनंद आहे की आम्ही याला लवकर शोधू शकलो.” असं मार्क म्हणाले. काल अंदाजे 90 करोड वापरकर्त्यांना फेसबुक मधून लॉग आउट करायला भाग पाडण्यात आलं. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललं गेलं आहे.

हल्लेखोरांनी फेसबुकच्या वेबसाईटवर जे ‘view as’ फीचर असतं त्याला मोठ्याप्रमाणात खोदून त्यातून माहिती मिळवली होती. आपली स्वतःची प्रोफाइल दुसऱ्याला कशी दिसते हे दाखवण्यासाठी या फीचरचा वापर केला जातो.

सॉफ्टवेअर फीचर असलेल्या फेसबुकच्या व्हिडीओ अपलोडींग प्रोग्राम मध्ये गेल्यावर्षी या बग (Bug) चे एकत्रिकरण झाले होते. ज्यामुळे हल्लेखोरांना तथाकथित लॉगिन टोकन मिळून त्यांना माहिती मिळवण्याची अनुमती दिली जाते. हे टोकन्स म्हणजे डिजिटल चाव्या असतात ज्या माहिती मिळवण्याची अनुमती देतात.

हा हल्ला फेसबुकवर, 2016 मधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या गैरमाहिती पुरवठा केलेल्या ब्रिटिश Cambridge Analytica या रशियाच्या सल्लागार कंपनीने फेसबुकच्या मदतीने 87 करोड लोकांचा डेटा वापरला असल्याचा आरोप आहे. Cambridge Analytica बद्दल बोलताना मार्क झुकरबर्ग म्हणाले,“We have a responsibility to protect your data, and if we can’t then we don’t deserve to serve you म्हणजे आम्ही तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदार आहोत, आणि जर आम्ही असं करू शकलो नाही, तर आम्हाला तुमची सेवा करण्याचा काहीही अधिकार नाही. आमच्याकडे तशी पात्रताच नाही.”