Google ने आपले नवीन दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. त्यात एक म्हणजे ‘Pixel 3‘ आणि दुसरा ‘Pixel 3 XL‘. दोन्ही फोन हे dual-tone matte finish केलेले असणार आहेत आणि मागील बाजूवर काच असणार आहे. हे फोन्स तीन वेगवेगळ्या कलर मध्ये ग्राहकांना उपलब्ध होतील त्यात काळा, पांढरा आणि तिसरा गुलाबी असे कलर आहेत. दोन्ही फोनचे फीचर्स हे जवळपास सारखेच असून फक्त फोनच्या उंचीमध्ये फरक आहे.

Pixel 3 आणि Pixel 3 XL या स्मार्टफोनचे फीचर्स –

1) Pixel 3 या स्मार्टफोनची स्क्रीन ही 5.5 इंच लांब full-HD असून, Pixel 3 XL या स्मार्टफोन ची लांबी 6.3 इंच आहे आणि दोन्ही फोनचा aspect ratio 18.5:9 एवढा आहे.

2) या स्मार्टफोनमध्ये 4 GB RAM आणि FHD+ OLED display आहे.

3) Pixel 3 चे Internal storage 64 GB असून Pixel 3 XL चे Internal storage हे 128 GB पर्यंत आहे.

4) Pixel मध्ये Qualcomm Snapdragon 845 प्रोसेसर असणार आहे.

5) यात Android चे 9.0 हे व्हर्जन वापरण्यात आले आहे.

6) हे दोन्ही फोन dual-SIM, असणार आहे आणि त्यात e-sim सपोर्ट सुद्धा असणार आहे.

7) दोन्ही मोबाईलचा मागील कॅमेरा हा 12.2 megapixel असून डबल पिक्सल स्मार्टफोन आहे आणि याचा फ्रंट कॅमेरा हा 8 megapixels चा आहे.

8)  Pixel 3 आणि Pixel 3XL फोनची बॅटरी ही 2915 आणि  3430 mAh इतकी असणार आहे.

या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत भारतात 80,000 रुपयांपासून सुरू आहे. 9 ऑक्टोबर पासून हा फोन भारतात सर्वांना खरेदीस उपलब्ध असणार आहे. HDFC बँकेच्या कार्ड होल्डर ला 5000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल तसेच फ्लिपकार्ट ने सुद्धा 4000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट, एक्सचेंज ऑफर सोबत भेटणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here