भारतातील सर्वात मोठी न्यूट्रीनो वेधशाळा भारतातील तमिळनाडू येथे तयार होत असून, त्या वेधशाळेचे नाव ‘India-based Neutrino Observatory’ असून ती तमिळनाडूच्या पश्चिमी घाटातील बोधी पश्चिम पर्वत भागात तयार होत आहे. तेथेनच 2 किमी अंतरावर पुदुकोट्टाई गाव असून ते थेनी जिल्ह्यात आहे. हा भाग तमिळनाडू-केरळ सीमेवर असून याच्या जवळच ‘मथीकेट्टन शोला राष्ट्रीय उद्यान, केरळ’ आहे.
सरकारने या वेधशाळेसाठी हाच भाग का निवडला तर याच उत्तर असं कि आपल्या पश्चिमी घाटातील Charnockite खडकामुळे आहे, हा खडक अतिशय घन असून खूप कठीण आहे. भूकंपाचा धक्का सहन करण्याची शक्ती या खडकात असल्यामुळे इथे जर वेधशाळा काढली तर भूकंपामुळे होणारा धोका कमीतकमी असेल आणि तसेच या बोधी पर्वतापासूनच एक रोड मार्ग आणि जवळुनच या वेधशाळेला लागणारी ऊर्जा ऊर्जाकेंद्र रसिंगपुरम स्टेशनवरून घेता येईल. हा भाग जैवविविधता हॉटस्पॉट असल्यामुळे सुरुवातीला पर्यावरणीय मान्यता मिळण्यासाठी खूप त्रास झाला, परंतु केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने काही अटी वर मान्यता दिली आहे. सरकारला आता ‘तमिळनाडू प्रदूषण नियंत्रण बोर्ड’ आणि ‘राष्ट्रीय वन्यजीवन बोर्ड’ या दोन्ही बोर्डच्या मान्यता घ्याव्या लागणार आहेत, अस असलं तरी मान्यता कॅटेगरी-‘ब’ अंतर्गत मिळाली असून ती कॅटेगरी-‘अ’ अंतर्गत मिळण्याची आवश्यकता आहे. तरीदेखील वेधशाळेच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू झालं आहे आणि ही वेधशाळा 2020 पर्यंत तयार होईल असा अंदाजही वर्तवण्यात येतोय.

न्यूट्रिनो बद्दल माहिती-

● न्यूट्रिनो हे अत्यंत सूक्ष्म असे प्राथमिक कण आहेत जे सूर्यापासून, अनेक सुर्यासारख्या ताऱ्यापासून मोठ्या प्रमाणात आणि केंद्रकिय संमेलन अभिक्रियेतून सुद्धा थोड्या प्रमाणात तयार होतात.

● हे न्यूट्रिनो आपल्या पृथ्वीच्या आणि पृथ्वीवरील प्रत्येक घटकाच्या आरपार सहजासहजी जाऊ शकतात.

● न्यूट्रिनो इलेक्ट्रिकली प्रभार रहित आहेत.

जर आपण याचा अभ्यास करून हे समजू शकलो की न्यूट्रिनो माहितीचं आदानप्रदान करू शकतात का? आणि करू शकत असतील तर कसं करतात? हे जर आपण शोधलं तर हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा शोध असणार आहे. आता आपण जे संदेशवहणकरता उपग्रह वापरतो त्यांची गरज भासणार नाही, मोबाईल फोन, इंटरनेट मध्ये मोठ्याप्रमाणात याचा वापर होऊन हे सर्व तंत्रज्ञान बदलता येणार आहे.
एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे, आपण न्यूट्रिनो तयार करत नाही तर आपण फक्त त्याचा वेध घेऊन त्याचा अभ्यास करणार आहोत. न्यूट्रिनो तयार करणं हे खूप जिकरीच आणि धोक्याचं काम आहे, आता आपण फक्त त्याच बारकाईने निरीक्षण करणार आहोत. संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या या न्यूट्रिनो वेधशाळेवर आतापासूनच आहे अजून वेधशाळा तयार होतीय. जगात फक्त चारच न्यूट्रिनो वेधशाळा आहेत.

जगातील चार न्यूट्रिनो वेधशाळा-

1) Deep Underground Neutrino Experiment(DUNE) – U.S.A.

2) Hyper Kamiokande – Japan

3) Jiangmen Underground Neutrino Observatory – China

4) India-based Neutrino Observatory – India

पण भारताच्या वेधशाळेला अमेरिका, जपान आणि चीन यांच्यापेक्षाही मोठे Iron Calorimeter Detector म्हणजे ICAL शोधक यंत्र असणार आहे. यामुळे नक्कीच भारत या मोहिमेत आघाडीवर येईल, आणि यायलाच पाहिजे. कारण संपूर्ण जगाला न्यूट्रिनो असतात हे भारताने दाखवून दिले होते. Kolar Gold Fiel प्रयोगात कर्नाटकात भारताने न्यूट्रिनो शोधले होते, यात ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ यांचा मोलाचा वाटा आहे.